2 दिवसात हवामान मोठे बदल, थेट होईल आरोग्यावर परिणाम, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात..
Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसात हवामानात मोठे बदल होतील. गेल्या काही दिवसांपासून सातत्याे हवामान बदलताना दिसत आहे. त्यामध्येच मोठा इशारा जारी करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल होताना दिसत आहे. उत्तरेकडे सध्या प्रचंड थंडी आहे. मात्र, गेल्या काही दिवसात राज्यात थंडी गायब झाली. मात्र, आता नुकताच भारतीय हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा मोठा इशारा दिला असून राज्यात पुढील काही दिवसात थंडी अधिक वाढेल असे सांगण्यात आलंय. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात 4 अंशांपर्यंत घसरण होऊ शकते. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असून पारा घसरत आहे. मागील महिन्याच्या तुलनेत राज्यात सध्यातरी थंडी कमी झाली. पुढील दोन दिवसात राज्यात शीत लहरीचा प्रभाव अधिक जाणवेल. यासोबतच कमाल तापमान 30 अंशापर्यंत राहिल. मराठवाड्यात किमान तापमानात हळूहळू वाढ होईल. मात्र, त्यानंतर थंडी वाढण्यास सुरूवात होईल. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी यंदा बघायला मिळाली. गायब झालेली थंडी राज्यात पुन्हा सक्रिय होईल, हे स्पष्ट आहे.
राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद धुळ्यात झाली. धुळ्यात 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गोदिंया येथे 9.8 तापमान नोंदवले गेले. यवतमाळ आणि परभणीत 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.सकाळी आणि रात्री जरी थंडी असली तरीही दुपारच्या वेळी उकाडा जाणवेल. बदलत्या वातावरणाचा थेट आरोग्याच्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
पुण्यात पुढील दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात उन्हाचा कडाका वाढला आहे तर पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. परिणामी पुढील दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.
वातावरणात सातत्याने बदल होत आहे. मात्र, यादरम्यानच झपाट्याने वायू प्रदूषण वाढत आहे. श्वसनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीसह अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीतील वायू प्रदूषण हा देखील मोठा मुद्दा आहे. त्यामध्ये आता पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
