AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : वातावरणात मोठा बदल, या राज्यात थेट इशारा, पुढील 24 तास..

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वातावरणात मोठे बदल होण्याचा अंदाज असून थंडी वाढू शकते.

Maharashtra Weather Update : वातावरणात मोठा बदल, या राज्यात थेट इशारा, पुढील 24 तास..
Maharashtra Weather Update
| Updated on: Jan 18, 2026 | 7:37 AM
Share

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. थंडी, पाऊस आणि उकाडा या तिन्ही गोष्टी सुरू आहेत. वर्षाच्या सुरूवातीच्या पहिल्याच दिवसी जोरदार पाऊस झाला. त्यापूर्वी डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी होती. उत्तरकेडून थंडी वाढताना दिसत आहे. उत्तरेकडील राज्यात भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज दिला असून पुढील काही दिवसात तापमानात घट होईल. उत्तरेकडे जरी कडाक्याची थंडी असली तरीही राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळत आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण आहे. राज्यातील बऱ्यापैकी थंडी गायब झाली. थंडी जरी गायब झाली असली तरीही वायू प्रदूषण काही कमी होत नाही. मुंबई, पुणे आणि दिल्लीत प्रचंड वायू प्रदूषण वाढलंय. मुंबईमध्ये सायंकाळच्या वेळी आकाशात अंधूक दिसते. वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

पुणे शहर परिसरात उन्हाचा पारा वाढल्याचे सध्या चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली असून थंडीचा जोर ओसरला आहे शहर आणि परिसरात रात्री आणि पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर मात्र उन्हाचा पारा अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे काही भागात दमट वातावरणाची अनुभुती नागरिकांना येत आहे. सतत वातावरणात बदल होत आहे.

हरियाणाच्या नर्नुल भागाता देशातील सर्वात नीचांका तापमानाची नोंद झाली. 3.0 अंश सेल्सिअस तापमान नर्नूल येथे नोंदवले गेले. राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली. धुळ्यात 8.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. परभणी येथे 10 अंश सेल्सिअस तापमान होते. बाकी आजही राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल.

22-23 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात हलक्या पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसह उत्तर भारताच्या बहुतेक भागांमध्ये, राजधानी दिल्लीतही तीव्र थंडीची लाट पसरली आहे. सकाळच्या वेळी दाट धुक्यामुळे अनेक भागात स्थिती गंभीर होत असून वाहने चालणे देखील कठीण झाले. पुढील काही दिवसांमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र होण्याच शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...