
राज्यात थंडीची चाहून लागल्याचे बघायला मिळतंय. पहाटे थंडी जाणू लागली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी उशीरा सुरू झाली. ऐन दिवाळीमध्ये पाऊस कोसळत असल्याने थंडी नव्हती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडी जाणवत आहे. असे असले तरीही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला. राज्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. मॉन्सून राज्यातून गेलेला असताना मोंथा चक्रीवादळ दाखल झाल्याने अनेक भागात जोरदार पाऊस झाला. राज्यात पावसाने थैमान घातले. पिकासह शेतातील मातीही शेतकऱ्यांची वाहून गेली. मोंथा चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश बसला. राज्यात पुढील काही दिवस पावसाचे ढग असणार असल्याचा अंदाज आहे.
पुढील 24 तासांत पावसाचे मोठे संकेत
पुढील 24 तासांत चार ते पाच राज्यांमध्ये हवामान सतत बदलत राहण्याची शक्यता आहे. विशेषतः केरळमध्ये 10 नोव्हेंबरपर्यंत वादळासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे, आंध्र प्रदेश आणि रायमसिला तसेच ईशान्य भागात पावसाचे मोठे संकेत आहेत. पावसासोबतच मोठे वादळ येण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडी वाढण्याची शक्यता
राज्यात तापमानात चढ उतार होऊ शकतो. राज्यात काही भागात अगदी दुर्रळक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. बाकी थंडी वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांमुळे दक्षिण भारतातील हवामान बदलण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या काही भागात नुकताच पाऊस पडला. मात्र, आता तिथेही थंडी वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाचा या राज्यांना मोठा इशारा
भारतीय हवामान विभागाने हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेश भागात पर्वतीय वाऱ्यांमुळे थंडी वाढण्याचे संकेत दिले आहेत. आयएमडीच्या मते, शनिवार आणि रविवारपर्यंत थंडी अधिक वाढेल. पुढील 24 तासात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटांवर वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. थोडक्यात काय तर पावसाचे ढग अजूनही गेली नाहीत.