
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस हजेरी लावताना दिसतोय. आजही अनेक भागात सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावली. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झालंय. नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाली असून पाऊस अजूनही सुरू असल्याचे दिसतंय. पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झाले. आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. फक्त राज्यच नाही तर देशातील काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे संकेत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोवा, पश्चिम बंगाल, सिक्किम,बिहार या भागात पावसाचा अलर्ट आहे.
कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मोठा इशारा
अंदमान निकोबार येथे अतिमुसळधार पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रात 5 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे. पुढील काही दिवसही पावसाचे संकट देशावर कायम असल्याचे बघायला मिळतंय. पंजाबनंतर महाराष्ट्रात पावसाने मोठे थैमान घातले. पूर्ण शेती वाहून गेली. हाताला आलेले पिक शेतकऱ्यांचे गेले. मात्र, आता अजूनही पावसाने आपला कहर थांबवला नसलयाचे स्पष्ट दिसतंय.
भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट जारी
पुढील 24 तास कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. नंदूरबार, जळगाव, धुळे, आहिल्यानंतर, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांडेद, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यता आहे. मागे झालेल्या अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान मराठवाड्याचे झाले होते. मोठा पाऊस मराठवाड्यात झाला.
5 तारखेपर्यंत राज्यावर पावसाचे ढग कायम
मराठवाड्यावरील संकट असूनही टळले नसून पावसाचा मोठा इशारा मराठवाड्याला देण्यात आलाय. अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहिर केली. मात्र, काही भागात अजूनही ही मदत पोहोचली नसल्याचा आरोप केला जात आहे. मोंथा चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस असल्याचे सांगितले जात होते. मात्र, मोंथा चक्रीवादळ शांत झाले असूनही देशातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.