योगायोग नव्हे, योगाने साधला व्यावसायिक योग! योगा बनला तगडा ब्रँड

योगायोग नव्हे, योगाने साधला व्यावसायिक योग! योगा बनला तगडा ब्रँड
योगा बनला व्यावसायिक ब्रँड
Image Credit source: सोशल मीडिया

भारतीय योगा वाढवण्यासाठी सरकारने जी साधना केली आहे. ती फळाला आली असून जगभरात योगदिन साजरा करण्यात येत आहे. त्यातून कोट्यवधींची उलाढाल असणारी इंडस्ट्री उभी झाली. हेल्थ आणि वेलनसबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढली आहे.

कल्याण माणिकराव देशमुख

|

Jun 21, 2022 | 3:23 PM

भारत आज आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) साजरा करत आहे. योग दिनाने भारताचा एक मोठा ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार झाला आहे. आरोग्य आणि मानसिकदृष्टा सक्षम राहण्यासाठी योगाचा मोठा हातभार लागलेला असतानाच अर्थव्यवस्थेला (Economy) चालना देण्याचे काम ही योगाने केले आहे. आज योग आणि तिच्या इतर शाखा मिळून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहे. कोरोना लाटेमुळे आरोग्याबाबत कमालीची जागरुकता आली आहे. योगासोबतच आयुर्वेदेला ही महत्व प्राप्त झाले आहे. योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. योग हा आता धर्म,प्रांत, आर्थिक मर्यादेच्या पुढे जाऊन पोहचला आहे. योगाचे हे पुनरुत्थान त्याच्या ब्रँड (Brand) होण्याचे द्योतक आहे. त्याला कॉर्पोरेट रुप आले आहे. त्यातून एक मोठी उभरता उद्योग देशात आणि देशाबाहेर उभा राहत आहे.2015 आणि 2019 दरम्यान, आयुष मंत्रालयाने (Aayush Ministry) योग दिनाच्या कार्यक्रमांवर 137 कोटी रुपये खर्च केले आहे. यामध्ये 50% जाहिराती आणि प्रसिद्धीसाठी खर्च करण्यात आले आहे. त्यातून आज कोट्यवधींची इंडस्ट्री उभी राहण्याचा दावा करण्यात येत आहे.

 

परदेशातील ब्रँडिंगवर 15कोटी रुपये खर्च

चार वर्षात आयुष मंत्रालयाने योग दिनाच्या कार्यक्रमांवर 137 कोटी रुपये खर्च केले आहे. यामाध्यमातून योगाच्या प्रचार आणि प्रसारावर भर देण्यात आला. अनेक देशात कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. खुद्द पंतप्रधानांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. एवढेच नाहीतर 2015-17 दरम्यान परदेशात कार्यक्रम आयोजनासाठी परराष्ट्र मंत्रालयाने 15 कोटी रुपये खर्च केले.

योग्य बनला जीवनाचा अविभाज्य भाग

गेल्या काही वर्षात योग हा निरोगी आयुष्यासह पर्यटनाचाही मोठा भाग झाला आहे. त्याने स्थानिक आणि परदेशी पाहुण्यांना, पर्यटकांना आकर्षित केले आहे. अनेक योग गुरु या काळात उदय पावले आहेत. योगावर मोठमोठ्या कार्यशाळा घेण्यात येतात आणि अनेक मोठ्या परिसरात योगाचे धडे गिरवण्यात येत आहे. वेलनेस टुरिझमने या काळात मोठा परिघ व्यापाला असून एकूण पर्यटनातही मोठी उलाढाल झाली आहे. कोरोनाचे सावट येण्यापूर्वी योगा आणि वेलनेस इंडस्ट्रीज 919 अब्ज डॉलरचा टप्पा गाठण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसेच परदेशी पर्यटनातही यामुळे 20 ते 30 टक्के वाढ झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मिंटने ग्लोबल वेलनेस इन्स्टिट्यूटच्याआधारे ही याविषयीचा आकडा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

गुगलवर ही मोठ्या प्रमाणात शोध

कोरोना महामारीत अवघे जग गुगलवर पोहचले. गुगल आणि ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून योगा जगभर फोफावला. गुगलवर सर्वाधिक योगाचे नाव सर्च करण्यात आले. त्यानंतर आता परिस्थिती निवळत असताना अनेक आश्रम, क्लासेस आणि योगा सेंटर हे सध्या योगा प्रेमींनी भरुन गेलेले आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें