AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हत्ती आला म्हणून कुत्रे भुकायचे थांबत नाही… इंदोरीकर महाराजांना महंत नामदेव शास्त्रींनी काय दिला सल्ला?

Indorikar Maharaj : निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा भव्य विवाहसोहळा आज संगमनेरमध्ये पार पडला. यावेळी भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी इंदोरीकर महाराजांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.

हत्ती आला म्हणून कुत्रे भुकायचे थांबत नाही... इंदोरीकर महाराजांना महंत नामदेव शास्त्रींनी काय दिला सल्ला?
Namdev ShastriImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 03, 2026 | 9:24 PM
Share

प्रसिद्ध कीतनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा भव्य विवाहसोहळा आज संगमनेरमध्ये पार पडला. या लग्नासाठी 100 एकरावर मंडप उभारण्यात आला होता. राज्यातील दिग्गज नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर या विवाहसोहळ्याला हजर होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ यांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच वारकरी सांप्रदायातील अनेक मंडळी यावेळी हजर होती. यावेळी भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी इंदोरीकर महाराजांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महंत नामदेव शास्त्रींनी काय दिला सल्ला?

इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या दिमाखात पार पडला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. त्यावेळी इंदोरीकर महाराजांनी लग्न आणखी मोठं करणार असं म्हणत ट्रोलर्सना उत्तर दिले होते. त्यानुसार आता लग्नसोहळाही थाटामाटात पार पडला आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना ट्रोल केले जाण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी इंदोरीकर महाराजांना सल्ला दिला आहे. शास्त्री म्हणाले की, ‘हत्ती आला म्हणून कुत्रे भुकायचे थांबत नाही. इंदोरीकरांना एकच सांगेल की टीकेला उत्तर न देता किर्तनातून उत्तर द्या.’

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले पाहुण्यांचे स्वागत

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटले की, ‘इंदोरीकर महाराज यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून लोक जागरणाचे काम केले. चांगला समाज निर्माण केला आणि समाजाला दिशा देण्याचं काम केलं. या मुलांच्या जीवनात आनंद यावा अशी प्रार्थना करतो. मला अतिशय आनंद आहे, या सोहळ्याला आम्ही उपस्थित आहोत. विखे पाटील, सुजय विखे, दोन्ही युवा आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व इंदोरीकर महाराजांवर प्रेम करणारे, या सर्वांचं मी या लग्नकार्यात स्वागत करतो.’

विखे पाटलांनी मानले आभार

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी म्हटले की, ‘सर्वांचे मार्गदर्शक किर्तनकार समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराजांच्या कन्येला आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह सर्व प्रमुख पाहुण्याचे मी आभार मानतो. वेळात वेळ काढून आपण वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात त्याबद्दल मी धन्यवाद मानतो.’ मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले की, ‘वधू वरांना आशीर्वाद देतो. महाराष्ट्राच्या बाहेर इंदोरीकरांची कीर्ती आहे. लोकांना खिळवून ठेवणारं व्यक्तिमत्व आहे. युट्यूबवर लाखो -करोडो लोक कीर्तन पाहतात , मी देखील कीर्तन बघतो.’

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ