इंदुरीकर महाराजांचे ‘ते’ 5 वादग्रस्त वक्तव्य…, महिलांची चपलेशी केलेली तुलना आणि…
महिलांसोबत शारीरिक संबंधांपासून ते महिलांची केलेली चपलीशी तुलना, आणि इंदुरीकर महाराज म्हणालेले, 'तुमची मुलं दिव्यांग जन्माला येतील...', 'त्या' वादग्रस्त वक्तव्यांमुळे माजलेली खळबळ

Indurikar Maharaj controversial statement : कीर्तनकार निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज कायम त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता देखील अनेकांनी इंदुरीकर महाराजवर निशाणा साधला आहे. आपल्या किर्तनामध्ये लग्न सधी करा… लग्न साधी केल्यानंतर देखील मुलं होतात आणि पैसा जपून ठेवा… असं म्हणणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यात मात्र बक्कळ पैसा खर्च केला आहे. ज्यामुळे देखील त्यांना टिकेचा समना करवा लागत आहे. पण आधी किर्तनामध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट हे बुद्धीवर असायला पाहिजेत….
सर्व्हिस करणाऱ्या लोकांवर निशाणा साधत इंदुरीकर महाराज म्हणालेले, ‘खरी कष्टाची ड्यूटी ज्यांची आहे, त्यांना पेमेंट कमी आहे. सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट हे बुद्धीवर असायला पाहिजेत. 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा, जिकती बुद्धी कमी तितकं पेमेंट कमी करायचं.’
‘तुमची मुलं दिव्यांग जन्माला येतील…’
इंदुरीकर महाराजांनी त्यांचे व्हीडिओ यूट्यूबवर टाकणाऱ्यांना खडसावून सांगणाऱ्यांना म्हणाली, ‘मझ्या किर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांचे मुलं दिव्यांग जन्माला येतील… त्यांचं वाटोळं होईल… मझ्या जीवावर आतापर्यंत 4 हजारपेक्षा जास्त लोकांनी युट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमावले आहेत… यात लोकांनी मला अडचणीत आणलंय…’
स्त्री संग सम तिथीला केल्यास…
“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते.
चपलांसोबत महिलांची तुलना
महिलांचा अपमान करणारं वक्तव्य देखील इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. ‘लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावाने हाक मारते…ही किती मोठा कमीपणा आहे… आपण पुरुष आहोत पुरुष… नवरा आहे नवरा… बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे? चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं.’
मोबाईलमुळे मुली बिघडतात…
“शाळेतल्या मुलीचं दप्तर तपासत जा. वह्या चेक करीत जा. एसटीचा पास चेक करीत जा. 8-10 दिवस झाले आपल्या पोरीची पास पंच नाही. मग पोरगी भुयारातून वर्गात निघती की काय, हे पाहा. मुलीचे मोबाईल चेक करत जा. तीन-तीन सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे. दोन नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही, सज्जन आहे तो. सायलेंट असतो. तो घरात फक्त कन्हतो… सध्या इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
