AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या पळून जातात पण… इंदोरीकर महाराजांनी प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या मुलींबद्दल केले मोठे विधान, थेट..

इंदोरीकर महाराज हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. त्यातच आता इंदोरीकर महाराज यांनी मोठे विधान केले. घरातून पळून जाणाऱ्या मुलींबद्दल त्यांनी मोठे विधान केले. यासोबतच राजकीय नेत्यांच्या वयाबद्दलची त्यांनी भूमिका मांडली.

त्या पळून जातात पण... इंदोरीकर महाराजांनी प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या मुलींबद्दल केले मोठे विधान, थेट..
Indurikar Maharaj
| Updated on: Oct 07, 2026 | 9:06 AM
Share

इंदोरीकर महाराज त्यांच्या किर्तनामुळे तूफान चर्चेत असतात. वाद आणि इंदोरीकर महाराज हे कनेक्शन कायमच बघायला मिळते. अनेकदा आपल्या किर्तनातील विधानांमुळे ते मोठ्या वादात सापडतात. मुलींची लग्न कशी साधी करून द्यावीत, यावर अनेकदा बोलताना इंदोरीकर महाराज दिसले. यासोबतच लग्नातील पैशांची उधळण रोखावी, असेही कायमच म्हणतात. मात्र, स्वत: च्या मुलीच्या लग्नात त्यांना सर्व गोष्टींचा विसर पडला. हे पैशांची उधळण स्वत:च्या लेकीच्या लग्नात करताना इंदोरीकर महाराज दिसले. कितीतरी एक्करमध्ये महाराजांच्या लेकीचा लग्नाचा मंडप होता. फुलांवरच लाखो रूपये खर्च करण्यात आली. महाराजांना लोकांनी यावरून चांगलेच सुनावले. इंदोरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा पाहून तर अनेकांना मोठा धक्काच बसला. लोकांनी महाराजांना चांगलेच सुनावले.

लेकीच्या हाैसेसाठी हे सर्व केल्याचे महाराजांनी म्हटले. दुसऱ्यांच्या लेकींना महाराज गुड्डी म्हणतात. माझी गुड्डी माझी गुड्डी म्हणून आई वडील कशी मुलींना डोक्यावर बसवतात, हे सांगतानाही ते अनेकदा दिसले. त्यातच आता पुन्हा एकदा इंदोरीकर महाराज चर्चेत आलेत. मुलींची पळून जाण्याची संख्या किती वाढली, यावर बोलताना आता इंदोरीकर महाराज दिसले आहेत.

इंदोरीकर महाराज यांनी म्हटले की, राज्यभरात मुली पळून जाण्याचं प्रमाण वाढले असून प्रेमाच्या जाळ्यात अडकत आहेत. मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे मुलीच्या पालकांची वाईट अवस्था होते. यावर स्पष्ट बोलताना इंदोरीकर महाराज दिसले. यासोबतच राजकारणी लोकांच्या वयावरही इंदोरीकर महाराज यांनी भाष्य केले. इंदोरीकर महाराज यांनी म्हटले की, पुढाऱ्यांनी वय 60 वर्षानंतर थांबायले हवे. त्यांनी राजीनामाच द्यायला हवा.

वय वाढेल तसे बौध्दिक पातळी कमी होत असते पण पुढारी वय वाढलं तसं वेड्यासारखं करतात. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी माढ्यातील अंजनगावातील किर्तनात वक्तव्य केले. आता इंदोरीकर महाराज यांच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. इंदोरीकर महाराज यांनी मुलींचे पळून जाण्याच्या प्रकरणावर थेट भाष्य केले. इंदोरीकर महाराज यांच्या या विधानावर पुढारी नक्की काय प्रतिक्रिया देतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?