गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक भोवली; मनसेला मोठा दणका, मोठी बातमी समोर

जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे, शनिवारी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती, या प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मनसे कार्यकर्त्यांना हे प्रकरण चांगलंच भोवलं आहे.

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक भोवली; मनसेला मोठा दणका, मोठी बातमी समोर
gunratna sadawarte
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 10, 2026 | 3:24 PM

गुणरत्न सदावर्ते यांनी अनेकदा राज ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. ते सातत्याने राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेंवर जोरदार टीका करत असतात. दरम्यान शनिवारी या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाल्याची पहायला मिळाली. शनिवारी गुणरत्न सदावर्ते जालन्याच्या दौऱ्यावर होते, यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई फेक केली. तसेच त्यांच्या गाडीवर सुपारी देखील फेकण्यात आली. त्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसेकडून गाडीवर शाईफेक झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई आणि सुपार्‍या फेकल्या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह तिघांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम  126(2), सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत रस्ता अडवणे, अवैध पद्धतीने जमाव जमवून घोषणाबाजी करणे, त्याचसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणे अशा विविध प्रकरणात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान आता या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यात आहे.

शनिवारी दुपारी जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली होती. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई तसचे सुपाऱ्या फेकल्या होत्या.  या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेवर गंभीर आरोप केले होते. या घटनेत जे द्रव्य फेकण्यात आले होते, त्यामध्ये केमिकल होते, त्यांचा मारण्याचा उद्देश होता का? असा सवाल यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता.  तसचे राज ठाकरे यांनी आपल्यासोबत वौचारिक चर्चा करावी असं थेट आव्हान देखील यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केलं होतं.

Follow Us