पुजाला न्याय मिळवून देण्यासाठी बहिणही सरसावली, इन्स्टावर भावूक पोस्ट, माझी बहिण वाघिण होती

Pooja Chavan | माझी बहिण वाघिण होती, ती असं करु शकत नाही, पूजाच्या बहिणीचा दावा (Pooja Chavan sister Dia Instagram Post)

पुजाला न्याय मिळवून देण्यासाठी बहिणही सरसावली, इन्स्टावर भावूक पोस्ट, माझी बहिण वाघिण होती

बीड- पुजा चव्हाण आत्महत्या ( Pooja Chavan suicide Case ) प्रकरण नवं वळण घेत आहे. आधी कथित मंत्री आणि कार्यकर्त्याच्या संभाषणाच्या क्लिप ( Audio Clip ) बाहेर आल्या. आणि आता तिची बहिण दिया चव्हाण ( Dia Chavan ) ही पुजाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढं सरसावली आहे. आणि सोशल मीडियावर पूजा चव्हाणबद्दल तर्कवितर्क लढवणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. याबाबत तिने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट ( (Instagram post of Dia Chavan ) टाकली आहे. या पोस्टमधून तिने माझी बहिण वाघिण होती. ती असं करु शकत नाही. आणि जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Instagram post of Dia Chavan, sister of Pooja Chavan who committed suicide)

पुजाची बहिण दियानं आपल्या पोस्टमध्ये लिहलंय…

2 दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काही ही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता, ती फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती माझी बहीण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की कसं काही करेल आणि हे तुम्हालापण चांगलंपणे माहिती आहे. मला आजसुद्धा विश्वास होत नाही तिने सुसाईड केलं आहे आणि जरी केलं असेल तर मोठीच कोणती तरी गोष्ट असेन. दीदीने नेहमी सर्वांना मदत केली आहे. काही विचार न करता तिने फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. जेवढं होईल तेवढं तिने मदत केली आहे. मी तिची लहान बहीण आहे हे माझं नशीब आहे. ती आज आपल्या सोबत नाही याचं जर तुम्हाला एवढं दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसा स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. मम्मी पप्पाला सांभाळायचं आहे अजून. आणि तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. निदान तिला जस्टिस मिळू शकत नाही तर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीने राहू द्या , ती जर हे सर्व पाहात असेल तर तिला किती त्रास होत असेल विचार करा

पूजाच्या बहिणीची पोस्ट:

(Instagram post of Dia Chavan, sister of Pooja Chavan who committed suicide)

Published On - 6:28 pm, Fri, 12 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI