AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका आयफोनमुळे गेला तिघांचा जीव, छत्रपती संभाजीनगरमध्ये डोंगरावरून पडून आई वडील अन् मुलाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मुलाचा आयफोन घेण्याचा हट्ट अख्ख्या कुटुंबाच्या जीवावर बेतला आहे, मुलासह आई-वडिलांचा देखील डोंगरावरून पडून मृत्यू झाला आहे.

एका आयफोनमुळे गेला तिघांचा जीव, छत्रपती संभाजीनगरमध्ये डोंगरावरून पडून आई वडील अन् मुलाचा मृत्यू
डोंगरावरून पडून तिघांचा मृत्यू Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 22, 2026 | 7:45 AM
Share

छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे, या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. देवळाली परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावरून पडून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि मुलाचा समावेश आहे. मुलगा कुणाल चांदगुडे वय 19 वर्ष, वडील मुरलीधर चांदगुडे वय 48 वर्ष आणि आई संगीता चांदगुडे अशी या घटनेतील मृतांची नावं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही कारणामुळे मुलगा कुणाल चांदगुडे यांचा आपल्या आई-वडिलांसोबत वाद झाला होता. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे कुणाला याला आयफोन 15 खरेदी करायचा होता, त्यासाठी तो हट्टाला पेटला होता. यावरूनच त्याचा त्याच्या आई -वडिलांसोबत वाद झाला. या वादानंतर मनात राग असल्याने तो आत्महत्या करण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. त्याच्या पाठोपाठ त्याचे आई-वडील देखील डोंगरावर पोहोचले, परंतु कुणाला हा कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

त्याच्या आई-वडिलांनी या डोंगरावर तब्बल तीन तास त्याची समजूत काढली, तो डोंगराच्या अत्यंत उंच असलेल्या भागावर उभा होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. आई-वडील आणि स्थानिक लोकांकडून तब्बल तीन तास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलिसांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली, मात्र तो काही डोंगरावरून खाली उतरण्यास तयार नव्हता.

शेवटी वडिलांचा संयम सुटला आणि त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये दोघही डोंगरावरून खाली कोसळले, मुलगा आणि वडील खाली कोसळल्याचा धक्का कुणालची आई सहन करू शकली नाही, त्यानंतर त्यांनी देखील डोंगरावरून खाली उडी मारली. या घटनेत या तिघांचाही मृत्यू झाला आहे. एका आयफोनच्या हट्टामुळे अख्ख कुटुंब क्षणात संपलं आहे. या दुर्दैवी घटनेत तिघांचाही मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा