AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला डिंक्या रोग अन् गुलाबी अळी पोखरतेय, उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्ला

उद्धव ठाकरे यांची तोफ आज नागपूरात धडाडली. त्यांनी लोकसभेला जशी साथ दिली तशी विधानसभेला देखील द्यावी आणि नागपूर रामटेक मधील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडीला निवडून द्याव्यात अशी साद मतदारांना घातली.

भाजपला डिंक्या रोग अन् गुलाबी अळी पोखरतेय, उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्ला
Uddhav Thackeray
| Updated on: Sep 29, 2024 | 8:34 PM
Share

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुर येथील सभेत भाजपावर जोरदार टीका केली. भाजपाने आपल्या पक्षात जी खोगीर भरती केलेली आहे. हे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना मान्य आहे का ? भाजपा सोबत असला तर साधू संत आणि दुसऱ्याकडे गेला तर चोर असा भाजपाचा खाक्या आहे. हे तुमचं हिंदुत्व कुठलं ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की हा शिवरायांचा पुतळा अप्रतिम रित्या तयार केला आहे. हा पुतळा आधीच तयार होता. परंतू मी पाऊस असल्याने थोडे थांबायला सांगितले.एक लाजीरवाणी घटना कोकणात घडली. केवळ लोकसभा निवडणूका जिंकायच्या म्हणून नौदल दिनाचे निमित्त साधून शिवरायांचा या पुतळ्याच्या उद्घाटनाचा घाट घातला. आम्हाला अभिमान आहे. परंतू ज्याने देशाचे आरमार प्रथम उभे केले त्या शिवरायांचा पुतळा उभारतानाही तुम्ही पैसे खाल्ले असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की भाजपासोबत असला की साधू संत. दुसऱ्याकडे गेला तर चोर. हे तुमचं हिंदुत्व कुठलं. भाजपचं हिंदुत्व थोतांड आहे. नागपूर हे संघाचं मुख्यालय आहे. मी मोहनजींना विचारतो की, आम्ही तुम्हाला हवेत की नको ते सोडा. पण ज्या पद्धतीने भाजप हिंदुत्वाचा थयथयाट करत आहेत ते तुम्हाला मान्य आहे का. भ्रष्टाचारी आणि इतरांना घेतलं जात आहे हा असला भाजपा संघाला मान्य आहे का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

गुलाबी अळी आणि डिंक्या रोग

संत्र्यांच्या शेतकऱ्यांची हालत बेकार झाली. कापूसवाल्यांची हालत कशी आहे. भाजपची हालत कशी झाली माहीत आहे माहीत आहे ना.संत्र्याला डिंक्या रोग येतो. खोडाला पोखरतो. भाजपला दाढीवाला ढिंक्या रोग झाला. खोड पोखरतो. कापसावर गुलाबी अळी पडते. जॅकेट असते की माहीत नाही. भाजपचं रोपटं संघाने पोसलं त्याला गुलाबी अळी आणि डिंक्या रोग लागलाय. हा भाजप तुम्हाला मान्य आहे का मोहनजी असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्र फिरणार

आपण लोकसभा जिंकली आहे. विधानसभा जिंकायची आहे. हे धर्माधर्मात मारामारी करीत आहेत. लावालावी करत आहे. असे हे गोमूत्रधारी हिंदुत्व भाजपचं आहे. लोकं मेले तरी चालेल पण आम्हीच सत्तेवर बसणार असे यांचे सुरु आहे. दसरा मेळावा शिवतिर्थावर घेणार. त्यानंतर आपण महाराष्ट्र फिरणार आहे असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी घोषीत केले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.