AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अन् देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री? भाजपच्या बड्या नेत्याने दिली सर्वात मोठी अपडेट

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती मिळावी आणि एकनाथ शिंदेंकडे राज्याचे नेतृत्व यावे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. यावर आता भाजपच्या बड्या नेत्याने उत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अन् देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री? भाजपच्या बड्या नेत्याने दिली सर्वात मोठी अपडेट
Fadnavis and Eknath Shinde NewsImage Credit source: Google
| Updated on: Jun 08, 2026 | 2:56 PM
Share

शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कडू यांनी म्हटले की, ‘राज्याचा मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा असावा, ही प्रत्येक शिवसैनिकाची प्रामाणिक भावना असू शकते. तसेच देवेंद्र फडणवीस यांना बढती मिळावी आणि शिंदेंकडे राज्याचे नेतृत्व यावे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. यावर आता भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार?

बच्चू कडू यांच्या विधानावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, 51% बहुमत महायुतीला मिळालं आहे, सर्वात मजबूत सरकार आहे, आम्ही एकत्र आहोत. देवेंद्र फडवणीस दिल्लीत जावे हा निर्णय करण्याचा अधिकार कोणाला नाहीये. देवेंद्र फडवणीस यांना विकसित महाराष्ट्राचा संकल्प करून देशातील सर्वात अव्वल राज्य तयार करायचे आहे. देवेंद्र फडवणीस दिल्लीत जावे हा विचार कोणी करू नये. असे गावा गावांमध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलून आपल्या भूमिका व्यक्त करू नये.

प्रत्येकाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा…

बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर बोलताना बावनकुळे यांनी म्हटले की, प्रत्येकाला वाटते आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. महायुतीमध्ये एकमताने देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री बनलेले आहेत. काही भूमिका अशा असतात त्या आपल्या पक्षनेत्याला विचारून भूमिका मांडायला पाहिजेत असं समन्वय समितीमध्ये ठरलं आहे. समन्वय समितीमध्ये ठरलेला निर्णय कोणी पाळत नसेल तर त्यावर चर्चा करू.

मलाही वाटतं शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत – सामंत

बच्चू कडू यांच्या विधानावर बोलताना शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची मागणी असेल. मी बच्चू कडू यांच्याशी बोललो आहे, मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची मागणी वैयक्तिक आहे. अशी मागणी स्वाभाविक मागणी आहे, माझीही मागणी आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. जशी भाजपची मागणी असते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे तशीच आमची मागणी असते, बच्चू भाऊंना ज्या सूचना करायच्या होत्या, विनंती करायची होती त्या केल्या आहेत.

Follow Us
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?