AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचा दलित उमेदवार हा पराभूत झाला हे दुर्दैवी; निरुपम यांची सडकून टीका

दलित उमेदवार चंद्रकांत हंडोरे ज्यांना काँग्रेस आमदारांच्या पहिल्या पसंतीची मते मिळायची होती. ते काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराकडून पराभूत झाले हे खरोखरच दुर्दैवी आहे.

काँग्रेसचा दलित उमेदवार हा पराभूत झाला हे दुर्दैवी; निरुपम यांची सडकून टीका
काँग्रेस नेते संजय निरुपम Image Credit source: tv9
| Updated on: Jun 20, 2022 | 11:51 PM
Share

मुंबई : विधानपरिषदेच्या पार पडलेल्या निवडणूकीत (Legislative Assembly elections) भाजपने पुन्हा एकदा राज्यसभेच्या निवडणूकीतील जलवा दाखवत आपला उमेदवार निवडूण आणला आहे. तर या विजयात भागेदारी कोण? भाजपला कोणी मतदान केलं? तर या निवडणूकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपला उमेदवार निवडूण आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र काँग्रेसमध्ये प्रयत्न होताना दिसले नाहीत. असेच काहीशी ओरड आता काँग्रेसच्या (Congress) गोटात होताना दिसत आहे. निवडणूकीचा निकाल हाती आल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम (Congress leader Sanjay Nirupam) यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. तसेच त्यांनी काँग्रेसचा दलित उमेदवार हा पराभूत झाला हे दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. याचे कारण आधीच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे. सरकारवर त्यांच्याच आमदारांचा विश्वास नाही. त्यामुळे आमचा पाचवा उमेदवार हा निवडणू येईल. आणि झाले ही तसेच. या विधान परिषदेत शेवटच्या क्षणी भाजपचे प्रसाद लाड चांगल्या मतांनी विजयी झाले. तर काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्कारावा लागला. तर या निवडणुकीत आघाडीची 21 मतं फुटल्याचे समोर आले. तर हे फक्त महाविकास आघाडीतला अंतर्गत रोष बाहेर पडल्याचेच दर्शवणारे होते. त्यामुळे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत आपली खदखद मांडली. ते म्हणाले, दलित उमेदवार चंद्रकांत हंडोरे ज्यांना काँग्रेस आमदारांच्या पहिल्या पसंतीची मते मिळायची होती. ते काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराकडून पराभूत झाले हे खरोखरच दुर्दैवी आहे. ही अंतर्गत दुफळी आहे.

दरम्यान पराभवानंतर चंद्रकांत हंडोरे यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.

दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेचे सचिन अहिर, हामशा पडवी हे उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबळकर आणि एकनाथ खडसेही दणक्यात विजयी झाले. तसेच भाजपणे आपली रणनिती आखल्या प्रमाणे राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांचा विजय झाला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.