AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP Mla : संजय राऊत यांना घराबाहेरचं कुत्रही विचारत नाही, भाजपं आमदाराने वापरले जिव्हारी लागणारे शब्द

BJP Mla : "त्यांच्या पुढच्या पिढ्या सांगतील, आमच्याच परिवारातील काहींनी हे माप हाप केलं आहे. काँग्रेसवर हा काळा धब्बा असेल तो कधीही पुसला जाणार नाही" असं हा भाजप आमदार म्हणाला. 'पक्षाने नाशिक प्रभारी म्हणून मला जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं करेल' असं त्यांनी सांगितलं.

BJP Mla : संजय राऊत यांना घराबाहेरचं कुत्रही विचारत नाही, भाजपं आमदाराने वापरले जिव्हारी लागणारे शब्द
Sanjay Raut
| Updated on: Apr 24, 2026 | 1:40 PM
Share

“रेल्वे उड्डाण पुलाला मंजुरी मिळाली. चाळीसगावकरांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. याच्या माध्यमातून शहरातील ट्रॅफिकला आळा बसणार आहे. मी रेल्वेमंत्री, खासदार स्मिता वाघ या सर्वांचे आभार मानतो. चाळीसगावकरांचं दळणवळण सुकर करण्यासाठी आम्ही अनेक प्रकल्प हातात घेतले आहेत. त्यातला एक प्रकल्प पुढे जातोय” असं भाजप आमदार मंगेश चव्हाण म्हणाले. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “संजय राऊत यांना घराबाहेरचं कुत्रही विचारत नाही. त्यामुळे संजय राऊत काय म्हणताय याला फार महत्त्व देण्याची गरज नाही” असं मंगेश चव्हाण म्हणाले.

“महिलांविषयी काँग्रेसची काय भूमिका आहे हा काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला. काँग्रेसच्या पापामध्ये ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, त्यांना पुढची पिढी कधीही माफ करणार नाही. ज्यांनी ज्यांनी विरोधात मतदान केलं, त्यांना महिलांच्या डोळ्यात डोळा घालून कधीही फिरता येणार नाही” असं आमदार मंगेश चव्हाण म्हणाले. ‘महिलांना मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्याचे महापाप काँग्रेसने केलं’ अशी टीका त्यांनी केली.

त्या संधीचं मी सोनं करेल

“त्यांच्या पुढच्या पिढ्या सांगतील, आमच्याच परिवारातील काहींनी हे माप हाप केलं आहे. काँग्रेसवर हा काळा धब्बा असेल तो कधीही पुसला जाणार नाही” असं मंगेश चव्हाण म्हणाले. ‘पक्षाने नाशिक प्रभारी म्हणून मला जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं करेल’ असं त्यांनी सांगितलं.

आरोप करणाऱ्यांची लायकी काय आहे?

उन्मेष पाटील यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, “आरोप करणाऱ्यांची लायकी काय आहे हे तुम्हाला माहित आहे. गिरणा बचाव आंदोलनावर मी सविस्तर बोलेन, आंदोलन करणारे काय धंदे करतात या संदर्भात मी पत्रकार परिषद घेऊनच भूमिका स्पष्ट करणार. मी माझे कार्यक्रम व लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये व्यस्त आहे.माझ्यावर आरोप करणाऱ्या लोकांना मी योग्य पद्धतीने वेळेवर उत्तर देईन”

त्यांच्या बुद्धीची कीव येते

“काँग्रेसचे लोक जसे महिला विरोधी आहेत तसेच आपल्या तालुक्यात काही लोक विकास विरोधी आहेत” नाव न घेता भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “त्यांच्या बुद्धीची कीव येते, दहा वर्ष ते लोकप्रतिनिधी होते. मी या सर्व विषयावर पत्रकार परिषद घेऊन मत मांडेन” असं मंगेश चव्हाण म्हणाले.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच