Maharashtra News LIVE : राघव चड्ढा यांचा नितीन नबीन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
Maharashtra News LIVE Updates: 1 मे पासून मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो चालकांना मराठी अनिवार्य करण्यात आली आहे. पण त्यावरून राजकीय आखाडा तापला आहे. महायुतीतील खडाजंगी दरम्यान आता शिंदेसेनेतील धुसफूसही समोर आली आहे.

शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून काल मोठा राडा झाला. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकांना शिव्या घातल्या. धमकीही दिली. त्यावरून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे. तर 1 मेपासून मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी बोलणे अनिवार्य करण्यात येत आहे. त्यावरूनही राजकारण तापले आहे. महायुतीत खडाजंगी सुरू असतानाच शिंदे सेनेतील काही नेत्यांनी या निर्णयाविरोधात दवंडी दिली आहे. काल बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक पार पडली. त्यासोबतच तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व मतदान झाले. हे मतदान आता कुणाच्या पारड्यात जाते, सत्ता बदल होतो का? याची चर्चा रंगली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर राज्य सरकार काय तोडगा काढते हाही कळीचा मुद्दा आहे. यासह राज्यातील इतर ठळक घडामोडी इथे वाचा
LIVE NEWS & UPDATES
-
अकोला : वंचित बहुजन आघाडीकडून घागर मोर्चा
पाणीटंचाईवरून महापालिकेविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घागर मोर्चा काढत महानगरपालिकेविरोधात जोरदार निषेध करण्यात आला. गांधीबाग येथून निघालेला हा मोर्चा महानगरपालिकेपर्यंत पोहोचला. 2016 साली अकोला महानगरपालिकेच्या हद्दवाढीनंतर तब्बल दहा वर्षे उलटूनही नव्याने समाविष्ट भागांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
-
राघव चड्ढा यांचा नितीन नबीन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी राघव चड्ढा यांना लाडू खाऊ घालून पक्षात स्वागत केले. तर चड्ढा यांनी भाजप अध्यक्षांना पुष्पगुच्छ दिली. या औपचारिक भेटीत चड्ढा अधिकृतपणे भाजपमध्ये सामील झाले. त्यामुळे आता राज्यसभेत आम आदमी पक्षाची स्थिती आता अत्यंत कमकुवत झाली आहे.
-
-
बीड : गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, घरातील साहित्य जळून खाक
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. बाळासाहेब जाधव यांच्या पत्नी पार्वतीबाई जाधव त्यांच्या पत्नीचे धुरंधर आजाराने निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर दहाव्याच्या विधीसाठी स्वयंपाक सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. या आगीत दोन घरे आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
-
रायगडमध्ये अशोक खरातच्या पत्नीच्या नावावर लाखोंची जमीन
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चाणजे येथील जमीन व्यवहार प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेच्या दिवशीच त्याच्या पत्नीच्या नावावर सुमारे 58 लाख रुपयांच्या जमिनीची नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 12 मार्च रोजी हा खरेदी व्यवहार नोंदणीकृत करण्यात आला असून, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच महसूल प्रक्रियाही वेगाने पूर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात निदर्शने
छत्रपती संभाजी नगर मध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या आरोपावरून हे आंदोलन उभारण्यात आलं आहे. या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. शहरातील पैठण गेट परिसरात आंदोलक एकत्र आले होते.
-
-
खासदार राघव चढ्ढा यांनी भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांची घेतली भेट
आपला सोड चिट्टी देणारे राज्यसभेतील खासदार राघव चढ्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली आहे. राज्यसभेतील ‘आप’च्या (AAP) दोन-तृतीयांश खासदारांनी भाजपमध्ये विलीन होत असल्याची घोषणा केली आहे.
-
शिवसेना नेते संजय निरुपम यांचा ऑटो-रिक्षा चालकांशी संवाद साधताना मनसेचा गोंधळ
शिवसेना नेते संजय निरुपम दहिसरमधील गणपत पाटील नगर येथे ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांशी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर संवाद साधणार होते. मात्र ही माहिती मिळताच स्थानिक मनसे नेते नयन कदम आणि कुणाल माईणकर कार्यकर्त्यांसह संजय निरुपम यांच्या आधीच सभेच्या ठिकाणी पोहोचले. पण तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना एका हॉटेलमध्ये नेऊन बसवले.
-
मराठी बोलणाऱ्या प्रवाशांशी मराठीत संवाद साधलाच पाहिजे – प्रताप सरनाईक
महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे त्या कायद्याचे प्रत्येकाने पालन केलं पाहिजे, जे प्रवासी तुमच्याजवळ मराठी बोलतील त्यांच्याबरोबर तुम्ही मराठीमध्ये संवाद साधलाच पाहिजे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
-
आप पक्षात महाभूकंप, राघव चड्ढासह 7 खासदार भाजपात
देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असलेले आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ते फक्त एकटेच भाजपात जात नाहीयेत. त्यांच्यासोबत राज्यसभेचे इतरही दोन खासदार भाजपात जाणार आहेत. थेट पत्रकार परिषद घेऊन राघव चड्ढा यांनी तशी माहिती दिली आहे.
-
धाराशिव जिल्हा परिषदेच्या लिफ्टमध्ये एक व्यक्ती अडकला
धाराशिव जिल्हा परिषदेच्या लिफ्टमध्ये एक व्यक्ती अडकला. लिफ्ट अचानक बंद पडल्याने एक व्यक्ती गेली दोन तासापासून लिफ्टमध्ये अडकल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी आणि सुरक्षारक्षकाची चावीसाठी धावपळ. सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ लिपिक प्रदीप कुलकर्णी असं या लिफ्ट मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव.
-
टीसीएस प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
नाशिक टीसीएस आयटी कंपनी महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण दबाव प्रकरणातील आरोपींना कोर्टात करण्यात आले हजर. न्यायालयीन कोठडी झालेली असताना नाशिक पोलिसांनी घेतला कारागृहातून ताबा.तोसीफ अत्तार ,दानिश शेख, शाहरुख कुरेशी , रजा मेमन यांचा घेण्यात आला नाशिक पोलिसांकडून ताबा
-
संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक
संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन एमएचबी पोलीस ठाण्यात आणले. बोरिवलीतील एमएचबी पोलीस ठाण्यासमोर मनसे कार्यकर्ते जमले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये खून प्रकरणातील निर्घृण हत्येचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर
छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक खून प्रकरणातील निर्घृण हत्येचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. 22 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेत आरोपी शैला सोनार हिने साधना सोनपेठकर यांच्या घरात घुसून पिस्तूलाचा धाक दाखवत चाकूने सपासप वार करत हत्या केल्याचं स्पष्ट होत आहे.
-
जळगावात सायलेन्सर तसेच फॅन्सी नंबर प्लेटवर फिरवले रोड रोलर
जळगावात वाहतूक पोलिसांची जप्त केलेले सायलेन्सर तसेच फॅन्सी नंबर प्लेटवर रोड रोलर फिरवले आहेत. वाहतूक नियमांच्या विरुद्ध या नंबर प्लेट्स आणि जायलेन्सर लावण्यात आलेले होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे 100 पेक्षा जास्त दुचाकीचे सायलेन्सर तसेच दीडशे पेक्षा जास्त दुचाकींच्या फॅन्सी नंबर प्लेटवर जप्त करण्यात आल्या होत्या. -
वाशिममध्ये घाटात कारचा भीषण अपघात
वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते मानोरा रोड वरील मानोरा येथील घाटात कारचा अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला तुटलेल्या अवस्थेत असलेल्या कठड्याचे काम पूर्ण न केल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार चक्क दरीत कोसळली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली. -
मुंबईच्या KEM रुग्णालयात 27 वर्षीय रुग्णाची आत्महत्या
अरविंद लोहार असे रुग्णाचे नाव. अरविंद लोहार हा डोंबिवलीत राहत होता. महिन्याभरापासून त्याच्यावर KEM रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटेच्या सुमारास रूम साफसफाईसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रूममधून बाहेर जाण्यास सांगितले होते, याच दरम्यान अरविंदने आत्महत्या केल्याची माहिती.
-
बजाजनगर खून प्रकरण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
बजाजनगर खून प्रकरणातील थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आरोपी महिला शैला सोनार पीडित साधना सोनपेठकर यांच्यावर चाकूने वार करताना व्हिडिओमध्ये दृश्य.आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले असता सुनावण्यात आली दोन दिवसाची पोलीस कोठडी.
-
जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी ते तीर्थपुरी रोड लगत असलेल्या भायगव्हाणशिवारात एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापेमारी करत जुगार चालकासह 32 जणांना ताब्यात घेतलं. जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि तीर्थपुरी पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं. शिवाय त्यांच्या ताब्यातून चार कार 22 मोटर सायकल 28 मोबाईल यासह इतर साहित्य मिळून एकूण 42 लाख 43 हजार हजार 640 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय.
-
गुणरत्न सदावर्तेच्या प्रक्षोभक भाषणानंतर मीरा भाईंदरमध्ये तणाव
काल मीरा भाईंदरमध्ये गुणरत्न सदावर्तेंने प्रक्षोभक भाषण दिल्याने शहरात तणावाचे वातावरण. मराठी भाषेचा अपमान आणि वातावरण खराब केल्याचा शिवसेना उबाठाचा आरोप. सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.हिंदी भाषिक रिक्षाचालकांना चिथावणी देत त्यांनी राज ठाकरे आणि प्रताप सरनाईक यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप उबाठाने केला आहे. या वादात पोलिसांनी मनसैनिकांवर गुन्हे दाखल केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या सदावर्तेंवर तातडीने गुन्हा नोंदवण्याची मागणी आता जोर धरत आहे. नवघर पोलीस स्टेशनला निवेदन दिले.
-
सहाव्या गुन्ह्यात अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी
26 एप्रिलपर्यंत अशोक खरातचा मुक्काम पोलीस कोठडीत असणार आहे. सहाव्या गुन्ह्यात अशोक खरातवर बलात्कार आणि विधीच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. पाण्यात मिसळलेले गुंगीकारक औषध, खायला दिलेले पदार्थ आणि आर्थिक फसवणूकीबाबत तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी झाली होती. तेच पेढे, तेच पाणी पुन्हा पुन्हा तोच तपास का? आरोपीला SIT समोर बसून ठेवण्यात आनंद मिळतो का? असा आक्षेप घेतला आहे,
-
गोंदियात मैदान चाचणी दरम्यान युवकाचा मृत्यू
गोंदिया येथे बिरसी या ठिकाणी आय. आर. बी. बटालियन येथे पोलीस भरती सुरू असून, आज पोलिस भरती सुरू असताना एका 19 वर्षीय युवकाचा मैदान चाचणी दरम्यानच अचानक प्रकृती खालावली. म्हणून त्याला गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले तिथेच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे…. मृतकाचे नाव बाळकृष्ण कदम 19 वर्ष रा. अहिल्यानगर असे आहे……
-
जळगावच्या सराफ बाजारात सलग तीन दिवसापासून सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच..
जळगावच्या सराफ बाजारात सलग तीन दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात 500 रूपयांची तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर घसरले आहेत.. आठवडाभरात सोन्याच्या दरात 2 हजार 300 रूपयांची तर चांदीच्या दरात 15 हजार रुपयांची घसरण झाली आहे…
-
गेल्या तीन दिवसापासून राज्यातील कर्मचारी बेमुदत संपावर, आज आंदोलनाचा चौथा दिवस
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागात गेल्या तीन दिवसापासून शुकशुकाट दिसत आहे. एकही कर्मचारी कामावर हजर नसल्याने टेबलांवर फाईलचा गठ्ठा पडून, नागरिकांची ही कामे खोळंबली आहेत. प्रलंबित मागण्यासाठी शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
-
सलग दुसऱ्या दिवशी एक्सप्रेस वे 12 ते 3 राहणार बंद
लोणावळा,पुणे – सलग दुसऱ्या दिवशी एक्सप्रेस वे 12 ते 3 बंद राहणार आहे.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग वरील कि.मी. क्र. 58/500 कुसगाव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे व रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई हून पुण्याकडे येणारी वाहतूक आज दुपारी 12.00 ते 3.00 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून,या रस्त्यावरून येणारी सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहूरोड किवळे मार्गे पुण्याकडे वळवण्यात येतील.
-
छत्रपती संभाजीनगर – चौथ्या दिवशीही सरकारी – निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर
छत्रपती संभाजीनगर – चौथ्या दिवशीही राज्यभरात सरकारी – निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पुन्हा आंदोलन करत सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.
5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी असून कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत सुरूच राहणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
-
भाजपात पराभूत झालेल्यांना विधानपरिषदेत संधी नाही ?
लोकसभा,विधानसभेत पराभूत झालेल्यांना भाजपकडून विधानपरिषदेत संधी देण्यात येणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संघटनेत काम करणाऱ्यांना संधी द्यावी असंही ठरल्याची माहिती समोर आली आहे.
-
जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात पुन्हा घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सलग तीन दिवसापासून सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा 500 रूपयांची तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर घसरले आहेत.
आठवडाभरात सोन्याच्या दरात 2 हजार 300 रूपयांची तर चांदीच्या दरात 15 हजार रुपयांची घसरण झाली आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बॅनरची जाळपोळ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेलनवाडी येथे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. श्यामवाडी ते अंधानेर या शिवरस्त्यावरील अतिक्रमण हटवावे, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. मात्र, प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याच रागातून संतप्त शेतकऱ्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बॅनरची जाळपोळ करत सरकारचा निषेध केला. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे.
-
जळगावात कडाक्याच्या उन्हापासून केळी वाचवण्यासाठी शेतकऱ्याची भन्नाट शक्कल; तागाच्या झाडांचा ‘नॅचरल फिल्टर’
जळगाव जिल्ह्यात वाढत असलेल्या तापमानाचा फटका केळीच्या बागांना बसू नये म्हणून एका शेतकऱ्याने केळीच्या रोपांशेजारी तागाची लागवड करण्याचा अभिनव प्रयोग राबवला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे केळीची पाने करपून रोपांचे मोठे नुकसान होते, मात्र तागाच्या झाडांमुळे रोपांना सावली मिळून बागेत ओलावा आणि थंडावा कायम राहतो. या पद्धतीमुळे केळीच्या रोपांची वाढ जोमाने होत असून उन्हाळ्यानंतर या तागाचा उपयोग गुरांचा चारा आणि सेंद्रिय खत म्हणूनही करता येणार आहे. वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही दिशादर्शक ठरत आहे.
-
झोमॅटो, स्विगीचे पार्सल घेऊन जाणारे सर्व मराठी बोलतात का? संजय निरुपम यांचा सवाल
मराठी सक्तीवरुन रिक्षा-टॅक्सी चालकांचा वाद विकोपाला गेला आहे. यावेळी नेते संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली. फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी चालकांना बेसिक मराठी भाषा शिकवा. झोमॅटो, स्विगीचे पार्सल घेऊन जाणारे सर्व मराठी बोलतात का? असा सवाल संजय निरुपम यांनी केला आहे.
-
जळगावात 12 वीच्या विद्यार्थ्याची शेतात आत्महत्या, मित्रांसोबतचा वाद जिव्हारी लागला
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे बारावीत शिकणाऱ्या भावेश अर्जुन माळी या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत शेतात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जामनेर बस स्थानक परिसरात काही विद्यार्थ्यांशी झालेल्या वादातून भावेश प्रचंड मानसिक तणावाखाली होता. हा वाद जिव्हारी लागल्याने त्याने कढोली शिवारातील शेतात जाऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जामनेर पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
-
उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार का? संजय राऊत म्हणाले…
विधानपरिषदेवर उद्धव ठाकरेंनी जावं ही आमची भूमिका आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळांनी उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा केली. मविआच्या प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे. काँग्रेस पक्षाध्यक्षांशी आम्ही चर्चा केली, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली
-
भोंदू अशोक खरातने केलेल्या बेकायदेशीर गर्भपातांचा शोध सुरु, ३ ते ४ डॉक्टर एसआयटीच्या रडारवर
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यासाठी एसआयटी (SIT) कडून कसून तपास केला जात आहे. खरातने आतापर्यंत किती महिलांचे बेकायदेशीर गर्भपात केले, तो किती दिवसांचा गर्भ होता आणि हे करताना कायदेशीर नोंदणी केली होती का, या सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोणतीही अधिकृत नोंदणी न ठेवताच हे गर्भपात केले गेल्याचा संशय असून, या प्रकरणात नाशिकमधील ३ ते ४ बडे डॉक्टर देखील एसआयटीच्या रडारवर आले आहेत. या शोधमोहिमेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
-
जामनेरमध्ये भीषण अपघात: ट्रॅक्टरला दुचाकीची धडक, दांपत्य जागीच ठार; १ वर्षाची चिमुकली बचावली
जामनेर येथील तोरणाळा स्मशानभूमीजवळ रात्रीच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. वेगाने जाणाऱ्या दुचाकीने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ५० वर्षीय गोपाल वासुदेव खडके आणि ४५ वर्षीय सोनाली गोपाल खडके या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला, मात्र सुदैवाने या घटनेत त्यांच्यासोबत असलेली एक वर्षाची चिमुकली सुखरूप बचावली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवले आहेत.
-
शिवसेना ठाकरे गट झाला आक्रमक
ठाण्यातील ज्ञानेश्वर नगर भागात काल शिवसेना ठाकरे गट आरोग्य कंटेनरला अडवल्यानंतर मोठा वाद झाला होता… शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट आमने सामने आली होती… पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आला… अखेर आरोग्य कंटेनर ज्ञानेश्वर नगर नाना नानी पार्क या ठिकाणी बसवण्यात आले आहे… हेच आरोग्य कंटेनर शौचालयाच्या बाजूला आणि नाना नानी पार्क लहान मुलांच्या खेळण्याच्या जागेवरती असल्या कारणास्तव हटवण्याची मागणी ठाकरे गटाचे स्थानिक नगरसेवक शहाजी खुस्पे आणिं स्थानिकानी केली होती…मात्र महापालिकेने केलेला सर्वे आणि परवानगी पाहता पोलिसांनी आरोग्य कंटेनर बसवले.
-
बीडच्या विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार
बीडच्या विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊसतोड मजूर महिलांवर कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर बेड उपलब्ध नसल्याने अक्षरशः खाली झोपवून उपचार देण्यात येत आहेत. हा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. यामुळे ऊसतोड मजूर असलेल्या या रुग्णांची मोठी हेळसांड होत असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान बेड उपलब्ध करून द्यावेत यासाठी आम्ही वरिष्ठांना कळविलेले आहे अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
-
बीडच्या उमापूर गावामध्ये पोलिसांसमोरच दोन गटात तुंबळ हाणामारी
किरकोळ कारणावरून वाद विकोपाला गेला. जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. गेवराई तालुक्यातील उमापूर या गावामध्ये, तू माझ्या घराच्या समोर दारू का पितोस असा जाब विचारत शिवीगाळ करून लाठ्या काठ्याने मारहाण. रात्री झालेल्या वादानंतर सकाळी पुन्हा पोलिसांसमोरच दोन गट भिडल्याचे समोर आले आहे.
-
गुणरत्न सदावर्ते यांना विरोध केल्याप्रकरणी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
मिरा भाईंदर मध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांना विरोध केल्याप्रकरणी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांन वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अविनाश जाधव आज नवघर पोलीस ठाण्यात येणार आहेत. मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांना भेटायला आलेल्या गुणरत्न सदावर्तेंना मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. सदावर्ते यांनी राज ठाकरेंबद्दल केलेल्या एकेरी भाषेतील वक्तव्यामुळे मनसे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे आणि इतर पदाधिकारी आक्रमक झाले होते. कालच्या राड्यानंतर नवघर पोलिसांनी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांन वरती गुम्हे दाखल केले असून आज सकाळी ११ वाजता त्यांना चौकशी साठी बोलावण्यात आले आहे
-
उच्च शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे पंढरपुरातील विद्यार्थिनींना मोठा आर्थिक फटका
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय मधील एआय आणि मास कम्युनिकेशन कोर्सेसचा महाडीबीटी पोर्टल मध्ये समावेशच नाही. त्यामुळे मुली शिष्यवृत्तीपासून वंचित. गेल्या दोन वर्षांपासून फी भरूनच मुलींना शिक्षण घ्यावं लागतंय. राज्यातील अनेक कॉलेजमध्येही अशीच परिस्थिती. महाविद्यालयाने वारंवार प्रस्ताव पाठवूनहीं कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. उच्च शिक्षण विभागाचा हलगर्जी कारभार उघड. विद्यार्थिनींची मागणी – तात्काळ शिष्यवृत्ती लागू करा!…….
-
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांचा संप चौथ्या दिवशी ही सुरूच
परिचारिकेच्या संपामुळे आरोग्य सेवेवरील ताण वाढला 8 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनचे आंदोलन सुरू. प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. रुग्नेसेवेसाठी नरसिंगच्या विद्यार्थिनींची मदत, संप सुरूच राहिला तर अडचणी वाढण्याची शक्यता. जुनी पेन्शन योजना लागू करा यासह विविध मागणीसाठी आंदोलन.
-
नाशिक आयटी कंपनीतील आरोपींना न्यायालयात हजर करणार
नाशिक मल्टिनॅशनल कंपनी अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपींना चौथ्या गुन्ह्यात आज नाशिक सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयित आरोपी तौसिफ आत्तार, दानिश शेख ,शाहरुख कुरेशी ,रजा मेमन यांना एसआयटीने नाशिक मध्यवर्ती कारागृहातून काल ताब्यात घेतले होते. आज दुपारच्या सुमारास संशयतांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी 29 तारखेला सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी काल सुनावणी होऊ शकली नाही. आता या प्रकरणी 29 एप्रिल रोजी अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी तारीख पे तारीख मिळत आहे. आता 29 तारखेला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
वसई-विरारमध्ये निर्जळी?
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जवळील शीरसाड येथे एका कंटेनर वाहनाचा अपघात होवून , त्या वाहनाने वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला जोरदार धडक दिल्याने वसई विरारला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली आहे. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे आता वसई विरार ला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, मात्र वसई विरार महापालिका पाईप लाईन दुरुस्ती चे काम युध्दपातळीवर करणार असल्याचं महापौर आजीव पाटील यांनी सांगितलं आहे.
-
कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरण
कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून आकाश ढगांनी दाटून आले आहे. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. उष्णतेपासून दिलासा मिळाला. मात्र वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
-
अजून एका भोंदूला अटक
भोंदू महेश गिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लैंगिक शोषण व जादू टोणाच्या गुन्ह्यात लासलगाव पोलिसांनी रात्री दीड वाजता अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 25 तासानंतर या महेश गिरी भोंदू बाबाला अटक करण्यात आली. आजभोंदू महेश गि रीला निफाड येथील कोर्टात हजर केले जाणार आहे. पुढील तपासासाठी लासलगाव पोलिसांकडून पाच ते सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे महेश गिरीचे मठ आहे.
-
नेस्को ड्रग्स प्रकरणात फिल्म इंडस्ट्रीशी कनेक्शन
काल अटक झालेली जिया जेकब ही फिल्म इंडस्ट्रीत साईड एक्टर आहे. एक्टिंगसह जिया जेकब मॉडेलिंग करते. जियाच्या बँक खात्यावर लाखोंचं ट्रान्स्क्शन समोर आले आहे. नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून तिला पैसे पाठवले गेले. जियाने अमली पदार्थ पुरवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांना गळ?
महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे हेच चेहरा असण्याची शक्यता आहे. काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची भेट घेतली. एक जागा महाविकास आघाडीकडे असावी आणि मतांमध्ये फूट पडू नये यासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव सातत्याने पुढे आणले जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published On - Apr 24,2026 8:06 AM
