Corona Update | कोरोना फोफावतोय, जळगावात शुक्रवार ते रविवार जनता कर्फ्यू, औरंगाबादेत रस्ते ओसाड

जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने (Jalgaon Corona Virus update) जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.

Corona Update | कोरोना फोफावतोय, जळगावात शुक्रवार ते रविवार जनता कर्फ्यू, औरंगाबादेत रस्ते ओसाड
Jalgaon Janta Curfew

जळगाव : जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने (Jalgaon Corona Virus Update) जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री 8 वाजेपासूनच जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी देखील रस्त्यावर उतरले आहेत (Jalgaon Corona Virus update Janta Curfew From Friday To Sunday And Night Curfew In Aurangabad ).

नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार

जनता कर्फ्यू दरम्यान शहरातील अत्यावशक सुविधे व्यतिरिक्त इतर व्यवसायिक दुकाने आणि इतर अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. तरीही जनता कर्फ्यू दरम्यान इतर आस्थापने आणि दुकाने सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या सहा पथकामध्ये एकूण 150 जणांचा समावेश आहे. प्रत्येक पथकात 25 कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. तसेच, कोणत्याही भाजीपाला मार्केट मध्ये किंवा शहरातील रस्त्यांवर देखील गर्दी झाल्यास महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.

जनता कर्फ्यू हा जनतेने स्वयंस्फूर्तीने पाडायचा असला तरी या कर्फ्यूमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश मनपा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, गुरुवारी रात्री आठ वाजेपासून शहरातील दुकाने आणि आस्थापना बंद झाल्या होत्या. जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी नागरिक आणि व्यावसायिकांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे चित्र पहायला मिळाले. शहरातील चौकाचौकात पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पहिला दिवस असल्याने पोलिसांकडून बळाचा वापर झाला नाही, नागरिकांना पोलीस जनता कर्फ्यू बाबत माहिती देत होते.

औरंगाबादेतही नाईट कर्फ्यू

औरंगाबादमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. त्याचबरोबर रुग्णसंख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. अशावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. वेरुळ-अजिंठा लेणीसह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं 4 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.

दरम्यान, औरंगाबादेत गुरुवारी मध्यरात्रीपासून अंशत: लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच बाजारपेठा सुरु राहणार आहेत. तर, रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. या नाईट कर्फ्यूच्या पहिल्याच रात्री औरंगाबादेतील रस्ते ओसाड पडल्याचं पाहायला मिळालं.

गर्दी होणारे सर्व कार्यक्रम आणि शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर नियम मोडणारी दुकाने लॉकडाऊन संपेपर्यंत सील करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

नागपुरात लॉकडाऊनची घोषणा

नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली. नागपूरमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असं नितीन राऊत म्हणाले. “नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार-रविवार बंदला म्हणजे मिनी लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला नाही. बाधित रुग्ण बाहेर पडत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन करावा लागत आहे”, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

Jalgaon Corona Virus update Janta Curfew From Friday To Sunday And Night Curfew In Aurangabad

संबंधित बातम्या :

Nagpur Lockdown again : नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर, 21 मार्चपर्यंत कडक निर्बंध

Nagpur Lockdown | नागपुरात लॉकडाऊन लावण्याची वेळ का आली? हा पाहा कोरोनाचा आलेख

नागपूरमध्ये लॉकडाऊन, कल्याण- डोंबिवलीत 7 ते 7 निर्बंध, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती काय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI