Hatnur Dam | हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडले, 82,417 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु

विदर्भ, मध्यप्रदेश, खान्देशात जोरदार पाऊस पडल्यामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे हतनूर धरनाचे 36 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत.

Hatnur Dam | हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडले, 82,417 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु

जळगाव : जळगावातील हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले (Hatnur Dam 36 Gates Open) आहेत. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 36 दरवाजे आज सकाळी अर्ध्या मीटरने उघडण्यात आले होते. आता ते पूर्ण उघडण्यात आले आहेत. तर पाच दरवाजे अद्याप पूर्ण उघडण्यात आलेले नाहीत (Hatnur Dam 36 Gates Open).

विदर्भ, मध्यप्रदेश, खान्देशात जोरदार पाऊस पडल्यामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे हतनूर धरनाचे 36 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. सध्या 82,417 क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हतनूर धरणाचे शाखा अभियंता एन. पी. महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

गेल्या 12 तासात हतनूर धरण परीसरात 15.55 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या धरणाची पाणी पातळी 209.530 मी आहे (Hatnur Dam 36 Gates Open).

11 दिवसांपूर्वीही हतनूर धरणाचे 6 दरवाजे अर्धा मीटरने उघडले

11 दिवसांपूर्वी 4 जुलैला हतनूर धरणाचे 6 दरवाजे सकाळी अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. जळगावसह मध्यप्रदेशात पावसाने हजेरी लावल्याने तापी-पूर्णा नद्यांमधून धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. सर्वाधिक पाण्याचा प्रवाह हा पूर्णा नदीतून येत आहे. तर नदी परिसरात पाऊस सुरुच असल्याने पाण्याची आवकही वाढत आहे. त्यामुळे हतनूर प्रशासनाने धरणाचे 6 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले होते.

Hatnur Dam 36 Gates Open

संबंधित बातम्या :

Mumbai Rains Update | मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस

पुढील पाच दिवसात विदर्भात तुरळक पाऊस, नागपूर हवामान विभागाचा अंदाज

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *