AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती विसर्जन सुरू होतं… अचानक पिता-पुत्र खदानीत बुडाले; पालिका पथक धावून आलं अन् पुढच्याच क्षणी…

Jalgaon News: गणेश विसर्जनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. अमळनेरमध्ये गणेश विसर्जनाच्यावेळी पिता-पुत्र खदानीत बुडाल्याची घटना समोर आली आहे.

गणपती विसर्जन सुरू होतं... अचानक पिता-पुत्र खदानीत बुडाले; पालिका पथक धावून आलं अन् पुढच्याच क्षणी...
| Updated on: Sep 23, 2026 | 9:15 PM
Share

महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अशातच जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावच्या अमळनेरमध्ये गणेश विसर्जनाच्या वेळी पिता-पुत्र खदानीत बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे गावात खळबळ पसरली आहे.

नेमकं काय घडलं? जळगावच्या अमळनेरमध्ये गणेश विसर्जनाच्या वेळी पिता-पुत्र खदानीत बुडाले. यानंतर सतर्क असलेल्या नगरपालिकेच्या पथकाने वेळीच उपाययोजना करत दोघांचेही प्राण वाचवले. देवळी खदानीत गणपती विसर्जन करताना ही घटना घटल्याचे दिसून आले आहे. नवव्या दिवसाचे गणपतीचे विसर्जनादरम्यान पिता-पुत्राचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले.

गणपती विसर्जनावेळी १० वर्षीय मुलाने वडिलांचा हात पकडला होता. यामुळे वडिलांचा पाय घसरल्यानंतर दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना दिसून येताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या अमळनेर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पथकाने क्षणाचाही विलंब न करता दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य केले.

अथक प्रयत्नांनंतर पिता-पुत्राला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. नगरपालिकेच्या पथकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. वेळेत मदत मिळाल्याने पिता-पुत्राचे प्राण वाचले. या बचावकार्यात स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक आणि मुकादम गोल्डी बिऱ्हाडे यांनी दाखवलेल्या धाडसाचे विशेष कौतुक होत आहे.

या घटनेनंतर गणेश विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी खदानी, तलाव किंवा खोल पाण्यात उतरताना विशेष काळजी घेण्याची गरज या घटनेतून पुन्हा निर्माण झाली आहे. प्रशासनाकडूनही विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या घटनेनंतर स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक आणि मुकादम गोल्डी बिऱ्हाडे यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी