Lalbaugcha Raja: लालबाग राजाच्या दर्शनाची इच्छा ठरली अखेरची यात्रा; दर्शन रांगेत उभा असताना काळाचा घाला
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जळगाव येथून आला पण, परत घरी परताच नाही.. राजाच्या दर्शनाची आस त्याच्यासाठी अखेरची ठरली. तरुणाचं जागीच निधन झालं... तर जाणून घ्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या तरुणासोबत नेमकं काय घडलं.

Lalbaugcha Raja: राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष दिसून येत आहे. पण मुंबई गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. मुंबईतील गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भक्त रज्याच्या विविध भागातून येत असतात. मुंबई, पुणे, सातारा, सांगली राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. अशात प्रत्येकाच्या केंद्रस्थानी असतो तो म्हणजे लालबागचा राजा…. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्त लांबून येतात आणि तासंतास लांब रांगेत उभे राहतात. कारण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागलेली असेत. सर्वत्र भक्तीमय वातावरण असं. पण मध्येच असं काही घडतं ज्यामुळे खळबळ उडते.
समोर येत असलेल्या माहितीनुसार, जळगाव येथील एक तरुण राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला. पण तो पुन्हा जळगाव येथे परतलाच नाही. आता बाप्पाचं दर्शन होणार म्हणून आनंदी असलेल्या तरुणाचं हृदयविकाराने निधन झालं. तरुणाच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ उडाली आणि अनेकांना मोठा धक्का बसला.
राजाच्या दर्शनासाठी आलेल्या तरुणाचं नाल जयदीप मेघराज नेमाडे असं असून, त्याचं निधन झालं आहे. जयदीप फक्त 25 वर्षांचा होता. समोर येत असलेल्या माहितीनुसार, जयदीप एक ट्रान्सपोर्ट व्यवसायिक होता. गणेशोत्सवात मुंबई येथे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला होता. गुरुवारी रात्री तो दर्शनरांगेत असतानाच त्याला अस्वस्थ वाटू लागलं.
जयदीप याची प्रकृती खालावल्यानंतर मंदिरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण तो पर्यंत उशीर झालेला. जयदीप याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. जयदीप यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला.
सांगायचं झालं तर, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची कायम मोठी गर्दी जमलेली असते. काही केल्या ही गर्दी कमी होताना दिसत नाही. यासाठी मोठ्या योजना देखील राबवल्या जातात. एवढंच नाही तर, पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर असतो. सोशल मीडियावर गर्दीचे फोटे आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसापर्यंत भक्तांची गर्दी असते. एवढंच नाही तर, विसर्जनासाठी देखील लोक मोठी गर्दी करतात.
