AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : कलानगर प्रवेशद्वारावर ठाकरेंच्या वकिलांनी स्वीकारली नोटीस!

| Edited By: | Updated on: Sep 19, 2026 | 5:52 PM
Share

Maharashtra News LIVE : दिशाचे वडिल सतीश सालियन यांच्या जबानीनंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आज दिशाचे वडिल सतीश सालियन हे नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत.

Maharashtra News LIVE : कलानगर प्रवेशद्वारावर ठाकरेंच्या वकिलांनी स्वीकारली नोटीस!
Big BreakingImage Credit source: tv9 Marathi

LIVE NEWS & UPDATES

  • 19 Sep 2026 05:52 PM (IST)

    कुंभमेळा बैठकीदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच गोंधळ

    नाशिकच्या सिंहस्थ प्राधिकरण कार्यालयात कुंभमेळा बैठकीदरम्यान गोंधळ झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच गोंधळ झाला.  त्र्यंबकेश्वरचे साधू महंत बैठक सुरू होताच आक्रमक झाले. त्र्यंबक राजाच्या प्रतिकृतीवरून साधू महंत भडकले.  बैठकीत ठेवलेल्या त्र्यंबक राज्याच्या मुखवट्यावरून साधू महंत संतप्त झाले.  ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीला लोकप्रतिनिधी, साधू महंत, प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत.

  • 19 Sep 2026 05:48 PM (IST)

    नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात बैठक

    नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात बैठक होत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी , साधू महंत उपस्थित आहेत.  नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा आणि ध्वजारोहण सोहळा पार्श्वभूमीवर बैठक लावण्यात आली आहे.  येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे.

  • 19 Sep 2026 05:42 PM (IST)

    सोयाबीनच्या कापणी प्रयोगावरून आमदाराने परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना धरलं धारेवर

    सोयाबीनच्या क्रॉप कटिंग वरून आमदार राहुल पाटील यांनी परभणीचे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांना धारेवर धरंल.  10 सप्टेंबर ही कापणी प्रयोगाची तारीख देऊन देखील अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी एकही कापणी प्रयोग घेतला नसल्याचा आमदार राहुल पाटील यांचा आरोप आहे. मात्र जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्याकडून मोघम उत्तर मिळाल्याने राहुल पाटील आक्रमक झाले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत नांदेड येथे झालेल्या बैठकीदरम्यान राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना प्रश्न केला होता.

  • 19 Sep 2026 05:40 PM (IST)

    केजल अग्रवाल हत्या प्रकरण, पोलिसांकडून चार्जशीट दाखल

    केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अखेर पोलिसांकडून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. तब्बल ५ हजार पानांची ही चार्जशीट असून, यामध्ये महत्त्वाचे पुरावे आणि साक्षीदारांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी मिळून केतन अग्रवाल ची लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासानंतर तब्बल ९० दिवसांच्या कालावधीअंती पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये हत्या प्रकरणाशी संबंधित विविध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील महत्त्वाच्या बाबींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 19 Sep 2026 05:15 PM (IST)

    जळगावातील चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन

    जळगावातील चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन केलं.  आदिवासी वासितगृहातील भोजन, स्वच्छता, पाणी, सुरक्षा आणि निवासाच्या सुविधां यावरून विदार्थ्यांनी आंदोलन केलं.  प्रकल्प अधिकाऱ्यांनी लेखी दिल्यावर तब्बल 8 तासानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित करण्यात आलं.  चोपड्यातील तिन्ही शासकीय आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थी-विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. मागण्या मुदतीत पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा आदिवासी विद्यार्थ्यांनी दिला.

  • 19 Sep 2026 05:04 PM (IST)

    काँग्रेसचे खासदार वानखेडे, यशोमती ठाकूर गणपती दर्शनासाठी बोंडे यांच्या निवासस्थानी

    बच्चू कडू यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर हे अनिल बोंडें यांच्या निवासस्थानी असलेल्या गौरी गणपतीच्या दर्शनाला पोहोचले आहेत. अमरावतीच्या राजकारणात अनिल बोंडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांच्यातल राजकीय वैर सर्वश्रुत आहे.  राजकीय वैर बाजूला ठेवून काँग्रेस नेत्यांनी  बोंडेंच्या घरी गौराईचे दर्शन घेतले.

  • 19 Sep 2026 04:53 PM (IST)

    भारत देश बनणार ‘सोलर पॉवर’! आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत पंतप्रधान मोदींचे मोठे प्रतिपादन

    भारताला जागतिक स्तरावर सौर ऊर्जेचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे आज आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरण आणि हवामान गतिकीचे भविष्य’या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.या आंतरराष्ट्रीय संमेलनात जगभरातील पर्यावरण तज्ज्ञ आणि प्रतिनिधींसमोर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, भारताला ‘सोलर पॉवर’ बनवण्याचे मोठे लक्ष्य देशाने डोळ्यासमोर ठेवले असल्याचे स्पष्ट केले.

  • 19 Sep 2026 04:47 PM (IST)

    ‘ठरल्याप्रमाणे सर्व होईल, तुम्ही काळजी घ्या’; विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केल्यानंतर तब्येत खालावल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली. रुग्णालयात मनोज जरांगे यांच्या खाटेपाशी बसून विखे पाटील यांनी त्यांच्याशी विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी जरांगे पाटील यांना आश्वस्त करताना विखे पाटील म्हणाले, ” ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी वेळेत पूर्ण होतील. तुम्ही आधी आपल्या आरोग्याची काळजी घ्या.”

  • 19 Sep 2026 04:35 PM (IST)

    शेतकऱ्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतातच दिले काजू बदाम

    नांदेड येथील दुष्काळी आढावा बैठकीत मंत्री आणि लोकप्रतिनिधींना काजू-बदाम वाढल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील बळीराजा कमालीचा संतप्त झाला आहे. या व्हीआयपी संस्कृतीचा अनोखा निषेध करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील टाकळगाव येथे एका हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शेतीची आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांनी थेट शेतातच गाठलं. शेतकऱ्यांनी केवळ घोषणाबाजीच केली नाही, तर कृषीमंत्र्यांच्या हातात चक्क काजू आणि बदामाची बशी टेकवून व्हीआयपी बैठकांचा तीव्र निषेध नोंदवला.

  • 19 Sep 2026 04:25 PM (IST)

    सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फी

    राजकीय आणि सहकार वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने थेट नियमभंगाची धडक कारवाई केली आहे. आरबीआयने बाबासाहेब पाटील यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ केले आहे. ज्यांच्या खांद्यावर राज्याच्या सहकार क्षेत्राची धुरा आहे, त्यांच्यावरच आरबीआयकडून ही कारवाई झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

  • 19 Sep 2026 04:16 PM (IST)

    दिशा सालियन प्रकरणाचा काहीही संबंध नाही; वरुण सरदेसाईंचा पलटवार

    दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात 500 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकल्यानंतर शिवसेना (UBT) नेते आणि आमदार वरुण सरदेसाई यांनी पक्षाची बाजू लावून धरत विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. “ठाकरे कुटुंबाचा किंवा आदित्य ठाकरेंचा दिशा सालियन प्रकरणाशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाही,” असे स्पष्ट मत वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

  • 19 Sep 2026 04:06 PM (IST)

    सतीश सालियान यांच्याकडून 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा!

    काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणी नवा एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपली भूमिका मांडली होती, ज्यामध्ये त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. या वक्तव्याविरोधात आक्रमक पाऊल उचलत सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 500 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

  • 19 Sep 2026 04:03 PM (IST)

    सतीश सालियान ‘मातोश्री’ परिसरात दाखल; कलानगर प्रवेशद्वारावर ठाकरेंच्या वकिलांनी स्वीकारली नोटीस!

    दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला आता अत्यंत वेगळे वळण लागले आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान हे आज आपल्या वकिलांसह शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. यावेळी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कलानगर परिसराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सतीश सालियान मातोश्री परिसरात पोहोचल्यानंतर कलानगरच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठाकरे यांच्या वकिलांनी ही कायदेशीर नोटीस स्वीकारली आहे.

  • 19 Sep 2026 04:02 PM (IST)

    सतीश सालियान यांची नोटीस आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी स्वीकारली

    सतीश सालियान मातोश्री येथे दाखल. त्यांची नोटीस आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी गेटवरच स्वीकारली.  मातोश्री परिसरात शिवसैनिकांचा मोठ्या गोंधळाचं वातावरण आहे.

  • 19 Sep 2026 03:59 PM (IST)

    नाशिक – डॉ. निलेश जेजुरकरला २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

    नाशिकमधील बहुचर्चित डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणी  डॉ. निलेश जेजुरकरला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. न्यायमूर्ती के एच पाटील यांच्यासमोर पार पडली सुनावणी.  6 मार्चला डॉ. निलेश यांच्या पत्नी डॉ. मनीषा यांनी आत्महत्या केली होती.  डॉ. निलेश याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा, तसेच डॉक्टर मैत्रिणीच्या सांगण्यावरून छळ केल्याचा आरोप आहे.

  • 19 Sep 2026 03:49 PM (IST)

    सतीश सालियान आदित्य ठाकरेंना नोटीस देणार

    दिशा सालियानचे वडील सतीश सालिया आणि त्यांचे वकील कलानगर परिसरात दाखल. ते मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरेंना नोटीस देणार आहेत. मातोश्री परिसरात शिवसैनिकही जमले. पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.

  • 19 Sep 2026 03:32 PM (IST)

    जळगाव – पिंप्राळ्यातील गुरुदत्त कॉलनीत गच्चीवरून पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

    जळगावच्या पिंप्राळ्यातील गुरुदत्त कॉलनीत गच्चीवरून पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.  मधुरा सुरेश खामणेकर असे मृत महिलेचे नाव असून ती 50 वर्षांची होती. ती कपडे वाळवण्यासाठी गच्चीवर गेली असता, अचानक तोल गेला आणि खाली पडल्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती.  याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • 19 Sep 2026 03:23 PM (IST)

    इगतपुरी – दुरुस्तीच्या कामासाठी घोटी रेल्वे गेट 6 दिवस राहणार बंद

    इगतपुरी – घोटी रेल्वे गेट क्रमांक 80 दुरुस्तीच्या कामासाठी  १९ ते २४ सप्टेंबरदरम्यान सहा दिवस वाहतूक  बंद राहणार.  दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गेट राहणार बंद.  अप आणि डाउन रोडवरील वाहतूक व ये-जा बंद असेल. रेल्वे गेट क्रमांक ८०, कि.मी. १४४/३२-३४ येथे दुरुस्तीचे काम होणार असून * वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

  • 19 Sep 2026 03:13 PM (IST)

    बीड – केज तालुक्यातील तरनळी येथील सानप वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळली, विद्यार्थी घेताहेत उघड्यावर शिक्षण

    बीड – केज तालुक्यातील तरनळी येथील सानप वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. आज विद्यार्थ्यांना एका घरासमोरील शेडमध्ये बसून शिक्षकांकडून शिकवले जात होतं. लवकरात लवकर नवीन इमारत देण्यात यावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

  • 19 Sep 2026 03:08 PM (IST)

    केंद्राची वाट न पाहता राज्य सरकार दुष्काळग्रस्तांना मदत करणार – राणा जगजितसिंह पाटील

    धाराशिव –  धाराशिव जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू झाला आहे.आता दुसऱ्या ट्रिगरसाठी आवश्यक असलेली माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार दुष्काळग्रस्तांना तातडीची मदत करणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली .

  • 19 Sep 2026 01:56 PM (IST)

    भाजपा आमदार संतोष दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर;सोयाबीन सह इतर पिकांची केली पाहणी

    जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक या गावासह आसपासच्या परिसरात भाजप आमदार संतोष दानवे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात दुष्काळ सदृश्य परिस्थिती मधील सोयाबीन कपाशी यासह इतर पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांची देखील उपस्थिती पहायला मिळाली.जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात मागच्या दीड महिन्यापासून पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची पीक करपून गेली, तर काही ठिकाणी पीक हातातून गेली त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन आता मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या व्यथा जाणून घेण्यास सुरुवात केली,

  • 19 Sep 2026 01:40 PM (IST)

    आमदार नरेंद्र मेहता आणि अजगर वोरा यांच्या जमिनीतील नवा ट्विस्ट

    भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेवेन इलेव्हन कंपनीने जमीन खरेदी जून २०१९ मध्ये केली , अन मनपा नगर रचना विभागाने बांधकाम परवानगी मात्र १ वर्ष आधीच जुलै २०१८ मध्ये दिली. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचा आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित ‘७-११ कन्स्ट्रक्शन’ (Seven Eleven Construction) कंपनीचा असा एक अजब आणि तितकाच धक्कादायक कारभार समोर आला आहे, जो पाहून कायदा आणि नियमांचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे स्पष्ट होते.

  • 19 Sep 2026 01:30 PM (IST)

    शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर व्यंगचित्रातून हल्लाबोल, लंडनचे यश खुपते, म्हणून पोटात दुखते अशी बोचरी टीका

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एका खोचक व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानावरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेने या व्यंगचित्रातून सडेतोड उत्तर दिले आहे.

  • 19 Sep 2026 01:20 PM (IST)

    केज तालुक्यातील तरनळी येथील सानप वस्तीवरील जिल्हा परिषद शाळा कोसळली

    17 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शाळा कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. संपुर्ण छत आणि भिंती अचानक कोसळल्या. इमारत धोकादायक झाल्याचे कळवुनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा पालकांचा आरोप असून लवकरात लवकर नवी इमारत देण्याची मागणी. दिवसा घटना घडली असती तर आमच्या लेकरांचा जिव गेला असता, प्रशासनाला इथे केवळ मृतदेह पाहायला यावं लागलं असतं…  कारवाई न झाल्यास पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • 19 Sep 2026 01:14 PM (IST)

    दानवेंच्या टीकेला आमदार राणा जगजितसिंह पाटलांचे प्रत्युत्तर!

    धाराशिव जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.  17 सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे आमदार अंबादास दानवे यांनी तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका करत, उजनीचे पाणी आले नसतानाही पाणी आले म्हणून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर केला होता.  या टीकेला आता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “दानवेंना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. मात्र, आमदार दानवेंना समोरासमोर बोलवा, आपण एकदा चर्चा करू,” असं आव्हान राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलं आहे.

  • 19 Sep 2026 01:00 PM (IST)

    जमीन नावावर नसली तरी महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळणार

    जमीन नावावर नसली तरी महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळणार आहे. महिला शेतकर्‍यांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय; महाकृषी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू आहे. शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना अधिकृत ‘महिला शेतकरी’ ओळख मिळणार आहे. पीक उत्पादन, पशुपालन, पोल्ट्री, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन करणाऱ्या महिलांना लाभ मिळेल.

  • 19 Sep 2026 12:50 PM (IST)

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शेतकऱ्यांच्या बांधावर

    पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दौऱ्यावर आहेत. तिवसा तालुक्यात चंद्रशेखर बावनकुळे शेती बांधावर दाखल झाले आहेत. तिवसा तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने अनेक ठिकाणचे सोयाबीनचे पीक करपले आहे. दुष्काळी स्थिती असलेल्या नुकसान ग्रस्त शेती पिकाची चंद्रशेखर बावनकुळे करत आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेती बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधला.

  • 19 Sep 2026 12:40 PM (IST)

    कृषी मंत्र्यांच्या ताफ्यासमोर काँग्रेसचे आंदोलन

    दीड महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे पीक वाळून गेली आहेत. त्यामुळे आज कृषी मंत्र्याच्या ताफ्या समोर शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात घोषणा देत आंदोलन केले. कोरडा दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी द्याअश्या घोषणा दिल्या. शेतकऱ्यांचा पोळा दुष्काळात गेलाय,गौरी सण दुष्काळात जातोय. पण ज्यांनी जिल्ह्याच पालकत्व स्वीकारलं ते पालकमंत्री अतुल सावे जिल्ह्यात ध्वजावंदनाला येतात. पण साधी शेतावर जाऊन पीक पाहणी करण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. त्यामुळे आम्ही या सरकारमधील कृषी मंत्र्यांना आज शेतातील वाळलेली पीक आणून भेट दिलीत. तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा आणि सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी निवेदनातून केलीये. जर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापेक्षा उग्र आंदोलन करू असा ईशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी दिलाय.

  • 19 Sep 2026 12:30 PM (IST)

    भाजपा आमदार संतोष दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर

    जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक या गावासह आसपासच्या परिसरात भाजप आमदार संतोष दानवे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात दुष्काळ सदृश्य परिस्थिती मधील सोयाबीन कपाशी यासह इतर पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांची देखील उपस्थिती पहायला मिळाली.जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात मागच्या दीड महिन्यापासून पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची पीक करपून गेली, तर काही ठिकाणी पीक हातातून गेली त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन आता मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या व्यथा जाणून घेण्यास सुरुवात केली

  • 19 Sep 2026 12:20 PM (IST)

    अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

    अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशनचे आमरण उपोषण सुरू झाले. उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. शासनाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादा आणि वेळेच्या नियमांचे पालन करून डीजे वाजवण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. साउंड आणि ध्वनी यंत्रणेवरील सरसकट बंदी तसेच अनावश्यक निर्बंध तत्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक मिरवणुका वगळता लग्न समारंभ आणि इतर शुभकार्यासाठी पोलीस परवानगीची अट शिथिल करण्याची मागणी येत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा असोसिएशनचा इशारा देण्यात आला आहे.

  • 19 Sep 2026 12:10 PM (IST)

    १५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा केळी पीक विम्याचा प्रस्ताव नाकारला?

    जळगाव तालुक्यातील १५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा कंपनीने केळी पीक विम्याचा प्रस्ताव नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. MRSAC अहवालाच्या आधारे विमा कंपनीने केळी पिक विमा दावे नाकारल्याचे आरोप करत शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. केळी पीक विम्यावरून विमा कंपन्यांच्या कारभारावर शेतकर्‍यांचा रोष दिसून आला. कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

  • 19 Sep 2026 12:00 PM (IST)

    दुष्काळाच्या बैठकीला काजू-बदामाच्या प्लेट

    नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात छत्रपती संभाजीनगरची आढावा बैठक सुरु आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे ऊर्जाराज्यमंत्री साकोरे बोर्डीकर बैठकीला उपस्थित आहेत. दुष्काळाच्या बैठकीत लोकप्रतीनिधीला काजू बादामाचा पाव्हणचार दिसला. आठ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. मराठवाड्यातील अनेक आमदार खासदार बैठकीला उपस्थित आहेत. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर काजू बादामच्या प्लेट उचलण्यात आल्या.

  • 19 Sep 2026 11:50 AM (IST)

    जळगावच्या पाचोरामध्ये वाळू माफियांवर मोठी कारवाई

    गिरणा नदीतील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल, पोलीस आणि आरटीओ यांची संयुक्त कारवाई. प्रशासनाने पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावातील गिरणा नदीतील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली आहे. महसूल विभाग, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) संयुक्त पथकाने या कारवाईदरम्यान २९ वाहने आणि यंत्रसामग्री जप्त केली. या कारवाईदरम्यान १८ ट्रॅक्टर, ८ डंपर, २ क्रेन आणि १ जेसीबी जप्त करण्यात आले. घटनास्थळावरून अंदाजे ७० ते ८० बॅरल अवैध वाळूही जप्त करण्यात आली.

  • 19 Sep 2026 11:40 AM (IST)

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

    अमित शहा सायंकाळी पाच नंतर कोल्हापूर मध्ये दाखल होणार. उद्या अमित शहा यांच्या हस्ते फ्री येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन एनर्जी प्रकल्पाच होणार भूमिपूजन. हुपरी मधील कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार देखील उपस्थित राहणार. महायुतीकडून अमित शहांच्या स्वागताची जय्यत तयारी

  • 19 Sep 2026 11:31 AM (IST)

    कृष्णेच्या पात्रात मगरीचा थरार… पाठलाग करत मगरीने केला कुत्र्यावर हल्ला

    सांगलीच्या भिलवडी येथील कुरण परिसरातील नदीपात्रात मगरीने कुत्र्यावर पाठलाग करून हल्ला केला. याचे व्हिडीओ तरुणांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहे.तर कृष्णा नदी पात्रात मगर दिसल्यामुळे घबराटीचे वातावरण पसरलं आहे. मगरीने कुत्र्यावर हल्ला केल्यामुळे नदीकाठच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • 19 Sep 2026 11:20 AM (IST)

    बीड केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणात CID कडुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर

    केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले हत्या प्रकरणात दहा आरोपींच्या विरोधात केज न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा हात असल्याचा आरोप वारंवार केला जातोय मात्र CCTV आणि सीडीआर तपासले अद्याप पर्यंत कुठेही सहभाग नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती.

  • 19 Sep 2026 09:50 AM (IST)

    शिक्षकाच्या पदोन्नतीनंतर बदलीला विद्यार्थ्यांचा विरोध

    गोंदिया येथे जिल्हा परिषद शाळेसमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. शिक्षकाच्या पदोन्नतीनंतर बदलीला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. ‘सरांची पदोन्नती याच शाळेत करा’, विद्यार्थ्यांची मागणी आहे. शिक्षक परत येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा.

  • 19 Sep 2026 09:40 AM (IST)

    पाऊस नाहीच, आता लोडशेडिंगचाही शेतकऱ्यांना फटका

    धाराशिव जिल्ह्यात गेल्या ४० दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात थोडेफार शिल्लक असलेल्या पाण्यावर पीक वाचवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, वीजपुरवठ्याच्या लोडशेडिंगमुळे उपलब्ध पाणीही पिकांना देता येत नसल्याची शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे.

  • 19 Sep 2026 09:29 AM (IST)

    आर्वी मार्गावर तळेगाव शिवारात भीषण अपघात

    वर्धा येथील आर्वी मार्गावर तळेगाव शिवारात भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  आयशर वाहन, डंपर, ट्रॅक्टरचा पहाटेच्या सुमारास अपघात घडला आहे.

  • 19 Sep 2026 09:20 AM (IST)

    आमदार बच्चू कडू आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांची भेट

    मागील काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू आणि अनिल बोंडे यांच्यामध्ये टीकाटिपणी सुरू होती. शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांची भेट झाल्याचे समोर आले आहे. बोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमाला बच्चू कडू यांनी हजेरी लावली.

  • 19 Sep 2026 09:15 AM (IST)

    नाशिकमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

    नाशिकमधील सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. डांगराळे, शिंदे, रोकडपाडा परिसरात भूकंपाचे धक्के जाणले आहेत. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

  • 19 Sep 2026 09:09 AM (IST)

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महत्त्वाचा निर्णय

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून पुढील ६ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गणेश मंडळांना देखावे खुले ठेवता येणार. आवाजाच्या मर्यादित ध्वनिवर्धक वापरास प्रशासनाची सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यापासून अनेक अपडेट समोर येत आहेत. दिशाचे वडिल सतीश सालियन यांच्या जबानीनंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आज दिशाचे वडिल सतीश सालियन हे नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताना 500 कोटींच्या भरपाईची मागणी केली आहे.

पुढील काही दिवस राज्यात पाऊस दांडी मारणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण मुंबईसह काही उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यापासून कर्नाटकपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. फक्त मुंबईच नाही तर पुण्यातही पाऊस सुरू आहे.

लाखो भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत. आज गौरी-गणपती विसर्जन आहे. त्यानंतर उद्या म्हणजे रविवारपासून भाविकांची गर्दी वाढेल. लालबागचा राजा, जीएसबी तसच अन्य प्रसिद्ध गणेश मंडळांच्या मंडपात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळणार. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी नियमित मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी नियमित ब्लॉक उद्या रविवारचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

Published On - Sep 19,2026 9:08 AM

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले