AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतापजनक! जळगावात 12 वर्षीय मुलीवर शेतात अत्याचार, पीडितेचा दगडाने ठेचून खून, चोपडा हादरलं!

जळगावच्या चोपडा तालुक्यात शनिवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. रस्त्यावर एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. तिच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

संतापजनक! जळगावात 12 वर्षीय मुलीवर शेतात अत्याचार, पीडितेचा दगडाने ठेचून खून, चोपडा हादरलं!
घटनेच्या निषेधार्थ चोपडा तालुक्यात मूक मोर्चा काढण्यात आला
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 08, 2024 | 3:58 PM
Share

राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. बदलापूरच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरलेला असताना राज्यातील विविध भागांमधून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. जळगावच्या चोपडा तालुक्यात अशीच एक संतापजनक घटना समोर येत आहे. चोपडा तालुक्यात अवघ्या 12 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आहे. आरोपी अत्याचार करुन थांबला नाही तर त्याने पीडित मुलीची दगडाने ठेचून हत्या केली. आरोपीच्या या संतापजनक कृत्यामुळे चोपडा तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

जळगावच्या चोपडा तालुक्यात शनिवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. रस्त्यावर एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. तिच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शेतातील निंदणीचे काम आटोपून पीडिता रस्त्याने आपल्या गावाकडे निघाली होती. पीडितेसोबत तिची लहान बहीणही होती. या दरम्यान शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बारा वर्षीय मुलीला आरोपीने एका शेतात ओढून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर घटना उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला दगडाने ठेचून मारुन टाकले. ही घटना 7 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी आरोपीला बेड्या कशा ठोकल्या?

हत्येनंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला विवस्त्र घटनास्थळावरून १०० फूट ओढत नेत कापसाच्या शेतात फेकून दिल्याचे समोर आले. संबंधित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडितेच्या बहिणीने गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर गावकऱ्यांनी शोधाशोध केली तेव्हा पीडितेचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तातडीने घटनास्थळाला भेट दिली.

पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चार पथके तयार केले. ही पथकं तातडीने कामा लागली. या दरम्यान चोपडा-आडगाव रस्त्यावर आरोपी पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. त्याच्यावर पोक्सो कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक साळवे यांनी दिली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी आज मोठ्या प्रमाणात आक्रमक होत मूक मोर्चा काढला.

Follow Us
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक