AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढदिवसाच्या शुभेच्छा नि अमर रहेच्या घोषणा… नाथाभाऊंच्या वाढदिवशी घडले काय? गिरीश महाजन यांनी तो किस्सा सांगताच हश्या पिकला

Girish Mahajan on Eknath Khadse: जळगावच्या राजकारणात मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात विस्तवही जात नाही हे सर्वांना माहिती आहे. टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. तर आता नाथाभाऊंच्या वाढदिवसाचा एक किस्सा त्यांनी सांगितला आणि तो व्हायरल होत आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा नि अमर रहेच्या घोषणा... नाथाभाऊंच्या वाढदिवशी घडले काय? गिरीश महाजन यांनी तो किस्सा सांगताच हश्या पिकला
गिरीश महाजन... एकनाथ खडसेImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 13, 2026 | 11:48 AM
Share

किशोर पाटील, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : जळगावच्या राजकारणात मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. दोन्ही नेते एकमेकांना डिवचण्याची एकही संधी दवडत नाहीत. एकमेकांवर आरोपाच्या फैरी करताना कचरत नाहीत. दोघांमधील राजकीय वितुष्ट अनेकदा दिसून आले आहे. तर आता जळगावमधील एका नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गिरीश महाजन यांनी नाथाभाऊंच्या वाढदिवसाचा (Girish Mahajan on Eknath Khadse) एक किस्सा सांगितला. त्यांच्या या किस्स्याने तिथे एकच हश्या पिकला. पण त्याचवेळी काहींनी यासंदर्भातील व्हिडिओ न काढण्याचे आवाहन केले. शुटींग न करण्याचे आवाहन केले. पण हा किस्सा समोर आला. आता यावरून वाद भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाथाभाऊंचा किस्सा नि महाजन खुदुखुदु हसले

जळगावात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसादिवशीचा किस्सा सांगितला. त्यात कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी अमर रहे अशा घोषणा दिल्याचे ते म्हटले. मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेल्या या किश्यावर उपस्थित आमदार तसेच पदाधिकारी यांच्यात एकच हंशा पिकला. एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाचा किस्सा सांगताना स्वतः मंत्री गिरीश महाजन खदखदून हसताना पाहायला मिळाले. अर्थात यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी महाजन किस्सा सांगत असताना त्याची शुटिंग न करण्याचा आग्रह धरला. त्यांनी हा व्हिडिओ न करण्याचे आवाहन केले. पण हा व्हिडिओ समोर आला आहे.

जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक पार पडली या बैठकीनंतर हा प्रकार घडला. जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांचा उद्या वाढदिवस असल्याने त्याच्या औपचारिक शुभेच्छा आज मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे देण्यात आल्या.आमदार सुरेश भोळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाचा किस्सा सांगितला. आता या नवीन मुद्दावरून जळगावातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. नाथाभाऊंची यावर अद्याप प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकले -राजेंद्र पवार

तर पंढरपूर येथे सरसकट कर्जमाफीसाठी आणि साताबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यांची शुगर कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर यावेळी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे सुद्धा आज आंदोलन स्थळी दाखल झाले. या आंदोलनामुळे ते भावुक झाले. मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकल्याचे ते म्हणाले. त्यांनी सरकारवर टीकाही केली. सरकार त्यांच्या धुंदीत धुंद असल्याचे राजेंद्र पवार म्हणाले.

काय आहे तो व्हिडिओ:

Follow Us
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर... काय घडलं?
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
Supriya Sule | शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही;  NCP-काँग्रेस विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; प्राथमिक माहितीतून खळबळजनक खुलासा
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!
क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, सिरसे गावात.....
Nashik | क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, झाडे पडली, सिरसे गावात हाहाकार