
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील घरी जबरी चोरी झाली. चोरट्यांनी यावेळी घरातील अनेक खोल्यातील सामन अस्ताव्यस्त केले. कपाट उचकटून काढले. त्यात खडसेंच्या खोलीतून 5 ग्रॅमच्या 4 सोन्याच्या अंगठ्या आणि 35 हजार रुपयांची रोख रक्कम चोरली. गोपाळ यांच्या पत्नीची गहुपोत चोरीला गेली. एकंदरीत त्यांच्या रुममधून सात आठ तोळ्याचे सोने चोरीला गेले आहे. रक्षा खडसे यांची खोली उघडून सामान उचकटण्यात आले. तर चोरटे सीसीटीव्ही तीन ते चार बॅग घेऊन पसार होताना दिसत आहेत.
सीसीटीव्ही आले समोर
एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी साठी आलेले चोरटे परिसरातील एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. पहाटे एक वाजून 54 मिनिटांनी दुचाकीवरून चोरटे करण्यासाठी आल्याचे दिसत आहे. त्यानंतर पुन्हा तीन वाजेच्या सुमारास चोरटे चोरी केल्यानंतर तीन ते चार बॅग सोबत घेऊन जाताना दिसत आहेत.
एक तासात चोरटे घरात चोरी करून पुन्हा परत निघून गेल्याचं सीसीटीव्ही फुटेज वरून समोर आला आहे. पोलीस गस्तीच्या वेळेतच ही चोरी झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज वरून देखील समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरट्यांची दुचाकी तसेच चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांचा तपास सुरू
जळगाव शहरातील शिवराम नगरमधील खडसेंच्या निवासस्थानी रात्री ही चोरी झाली. त्याचे सीसीटीव्ही समोर आले आहे. या चोरीच्या घटनेबाबत पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार, चोरट्यांनी 868 ग्रॅम एवढं सोनं आणि 35 हजार रुपये एवढा मुद्देमाल चोरला. सध्या घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसे तज्ञांच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच पोलीस ठाण्याची ही स्वतंत्र पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना झाले आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यात पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले आहेत. त्यात रात्री चोरटे दुचाकीवरुन आल्याचे दिसते. तसेच त्यांच्याकडे तीन ते चार बॅग असल्याचे दिसत आहेत. याप्रकरणात जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पण पोलिसांनी बड्या नेत्याचे घर फोडून चोरी केली आणि पोलिसांनाच थेट आव्हान दिल्याची चर्चा सुरू आहे.