AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या घरी जबरी चोरी, इतक्या अंगठ्या आणि रोख केली लंपास, पोलिसांनाच थेट आव्हान

Robbery in Eknath Khadse Home : राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी चोरट्यांनी हात सफाई केली आहे. यामध्ये सोन्याच्या अंगठ्यांसह काही रोख रक्कमे चोरट्यांनी चोरली. शहरात चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या घरी जबरी चोरी, इतक्या अंगठ्या आणि रोख केली लंपास, पोलिसांनाच थेट आव्हान
एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी
| Updated on: Oct 28, 2025 | 10:45 AM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावतील निवासस्थानी चोरी झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या जळगाव मधील निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडत तर मजला तसेच पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे घरकामगार साफसफा करण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.

चार सोन्याच्या अंगठ्या रोख रक्कम लंपास

दिवाळीनिमित्त एकनाथ खडसे हे बाहेरगावी होते. त्यांच्या या घरात एक सुरक्षारक्षक असतो. पण तोही सुट्टीवर होता. ही संधी साधत चोरट्यांनी एकनाथ खडसे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील सर्व कपाटं उचकलीत. सामान अस्तव्यस्त केले. त्यांनी 5 ग्रॅम वजनाच्या 4 सोन्याच्या अंगठ्या आणि 35 हजार रुपये रोख रक्कम लांबवल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. तर रक्षा खडसे यांच्या खोलीतही त्यांनी प्रवेश केला आणि चोरी केल्याचे समोर आले आहे.

या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा इतर काही गोष्टींची जुळवाजुळव पोलिस अधिकारांकडून केले जात आहे. तळमजल्यावरील खोल्या तसेच पहिल्या मजलावरील खोल्यांमधील कपाटे तोडून त्यातील मुद्देमाल चोरून नेला आहे. याच घरामध्ये रक्षाताई खडसे यांचे देखील खुले असेल त्यांच्या खोलीतील देखील कपाटांचे कुलूप तोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगर शहरांमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना ताजी असतानाचा जळगाव मध्ये एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

या चोरीच्या घटनेविषयी एकनाथ खडसे यांनी माहिती दिली. जळगाव शहरातील शिवराम नगरमध्ये निवासस्थानी रात्री ही चोरी झाली. सकाळी हा प्रकार उघड झाला. चोरट्यांनी घरातील सामानाची आचकउचक केली आहे. माझ्या रुममधील 5 ग्रॅमच्या 4 सोन्याच्या अंगठ्या आणि 35 हजार रुपये रोख होते. गोपाळच्या रुममध्ये त्याच्या पत्नीची गहुपोत होती. एकंदरीत त्यांच्या रुममधून सात आठ तोळ्याचे सोने चोरीला गेले आहे. रक्षा खडसे यांची रुमही शेजारीच आहे. तिथेही सामान उचकलेले आहे. वॉचमन सुट्टीवर होता. रात्री केव्हा चोरी झाली हे सांगता येणार नाही. पोलिसांना या घटनेची आता सकाळी माहिती देण्यात आली. पोलीस दाखल झाले आहेत आणि ते तपास करत आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

घटनास्थळी श्वानपथक

एकनाथ खडसे यांच्या चोरीच्या घटनेबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती दिली आहे. पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी याविषयीची माहिती दिली. 868 ग्रॅम एवढं सोन आणि 35 हजार रुपये एवढा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आल्यास पोलिसांनी सांगितलं. घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसे तज्ञांच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच पोलीस ठाण्याची ही स्वतंत्र पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासणी केली जात असून अद्याप संदर्भातली कुठलेही धागेदोरे पोलिसांना मिळालेले नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

खडसेंच्या पाठीमागे शुक्लकाष्ट

खडसेंचे जावाई पुण्यातील एका पार्टी प्रकरणात अडकले. त्याविषयीची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. तर 10 ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर तालुक्यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता. त्याने एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रीय महामार्ग 6 वर रक्षा ऑटो फुएल्स या ठिकाणी तसेच कर्की आणि तडवेल येथील अशा एकून तीन पेट्रोल पंपांवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला होता. त्यावरून खडसे यांनी सरकार आणि पोलिसांवर निशाणाही साधला होता.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.