“मी एकटा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून काय केलं असतं ?; या मंत्र्याचा ठाकरे गटाला प्रतिसवाल…

| Updated on: May 14, 2023 | 10:23 PM

भगवा झेंडा वाचवण्यासाठी मी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत गेलो असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही पक्ष सोडलेला नाही दुसऱ्या पक्षासोबत गेलेलोही नाही अजूनही शिवसेने सोबतच आहोत.

मी एकटा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून काय केलं असतं ?; या मंत्र्याचा ठाकरे गटाला प्रतिसवाल...
Follow us on

जळगाव : महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडण्यात आल्या. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून ठाकरे गट आणि शिवसेनेकडून टीका टिपणी केली जात असली तरी ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यासह बंडखोरी केलेल्या आमदारांवर त्यांनी गद्दार आणि खोक्यांचे सरकार असल्याचे टीका केली जात आहे. त्यावरून आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटासह विरोधकांना प्रतिसवाल केला आहे.

लोकांनी आम्हाला गद्दारी गद्दारी म्हणून चिडवलं असलं तरी मी गुवाहाटील 30 नंबरला गेलो होतो. तसेच माझ्या आधी 32 आमदारही गेले होते.

या गोष्टीची आठवण करुन देत मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला 40 आमदारांचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

सत्ता समीकरण बदलण्यासाठी आदीच जळगाव जिल्ह्यात पाच आमदार गेले होते. त्यापैकी चार आमदार माझ्याही आधीच तिथे पळून गेले होते.

त्यानंतर नागपूरचाही आमदार पळून गेला होत. बुलढाणा, जळगाव,नाशिक,दादर-ठाण्याचे सर्वच आमदार शिंदे यांच्यासोबत पळून गेले होते असा सगळा त्यांनी त्यावेळचा घटनाक्रमही त्यांनी यावेळी सांगितला.

हे आमदार गेले असले तरी नाशिक ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो असंही त्यांन यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे मी एकट्याने उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून काय केलं असतं ? सर्वच शिंदे सोबत पळून गेले होते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

चार खांदे गेले होते त्यानंतर मी एकटा राहून काय करू ? असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी केला होता. मी गेलो नसतो तर शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास ज्या प्रकारे होत आहे तो महाराष्ट्राचा विकास झाला नसता असंही त्यांनी यावेळी विश्वासानं सांगितले.

आपल्या मंत्रिपदाच्या प्रवासाविषयी सांगताना ते म्हणाले की, हे मंत्रीपद मला सहज मिळालं नाही 15 ते 20 वेळा मी जेलमध्ये गेलो होतो.

त्यामुळे शिंगाडे मोर्चा म्हणून गुलाबराव पाटील हा महाराष्ट्रात फेमस होता असंही त्यांनी यावेळी सांगितले. सर्व आयुष्य मी संघर्षात घालवलं आहे. त्यावेळेस मी सत्तेची लालच केली नाही मी तर मंत्रि पद सोडून गेलो होतो.

माझी आमदारकीही गेली असती असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो आहे. आणि हिंदुत्वासाठी मी हा सट्टा खेळलो आहे असंही त्यांनी छातीठोकपणे सांगितले आहे.

भगवा झेंडा वाचवण्यासाठी मी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत गेलो असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही पक्ष सोडलेला नाही दुसऱ्या पक्षासोबत गेलेलोही नाही अजूनही शिवसेने सोबतच आहोत.

त्यामुळे विरोधकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की तुमच्यासारखं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलो नाही तर आम्ही शिवसेनेसोबतच आहे असा ठणकावूनही त्यांनी यावेळी सांगितले.