ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; महिला नेत्याचा दोन दिवसात पक्षप्रवेश अन् लोकसभेचं तिकीटही, सूत्रांची माहिती

| Updated on: Mar 10, 2024 | 2:45 PM

BJP Leader Lalita Patil May Be Enter in Shivsena Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत; महिला नेत्याचा पक्षप्रवेश पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती, कोण आहेत या महिला नेत्या? कधी होणार पक्ष प्रवेश? वाचा सविस्तर बातमी....

ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; महिला नेत्याचा दोन दिवसात पक्षप्रवेश अन् लोकसभेचं तिकीटही, सूत्रांची माहिती
Follow us on

किशोर पाटील , प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जळगाव | 10 मार्च 2024 : देशभरात सध्या निवडणुकीचं वारं वाहतं आहे. काहीच दिवसात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. अशात कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा होत आहे. अशातच काही नेत्यांचं पक्षांतरही पाहायला मिळू शकतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. बड्या महिला नेत्याचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय या महिला नेत्याला लोकसभेला उमेदवारीही दिली जाण्याची शक्यता आहे.

ठाकरे भाजपला मोठा धक्का देणार?

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधी उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. अशात भाजपच्या नेत्या ॲड. ललिता पाटील यांना ठाकरे गटात घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. पुढच्या दोन दिवसात ललिता पाटील या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत ललिता पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

आधी पक्षप्रवेश अन् मग उमेदवारी?

जळगावमध्ये ललिता पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरु आहे. जर ललिता पाटील यांनी ठाकरे गटाच प्रवेश केला तर जळगावमधून लोकसभेसाठी त्यांचं नाव निश्चित होणार असल्याची शक्यता आहे. ॲड. ललिता पाटील या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर भाजपच्या पदाधिकारी आहेत. ॲड. ललिता पाटील यांनी काल मुंबईत मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे ललिता पाटील लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत काय निर्णय?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत उमेदवारीबाबत महत्वाची चर्चा झाली. या बैठकीत जळगाव लोकसभेत उमेदवार म्हणून ललिता पाटील यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.