सामान्य शेतकरी कन्या आज मंत्र्यांच्या घरचा उंबरठा ओलांडणार.. कोण आहे प्रेरणा भगवान पाटील?

| Updated on: Nov 29, 2021 | 5:26 PM

जळगावचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ पुत्र विक्रम पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न होत आहे. जळगाव जिल्ह्यातीलच चोपडा तालुक्यातील शेतकरी कन्या प्रेरणा पाटील हिच्यासोबत विक्रम यांचे लग्न होत आहे.

सामान्य शेतकरी कन्या आज मंत्र्यांच्या घरचा उंबरठा ओलांडणार.. कोण आहे प्रेरणा भगवान पाटील?
जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांच्या कनिष्ठ चिरंजीवांचे लग्न शेतकरी कन्येसोबत.
Follow us on

जळगावः राज्याची राजधानी मुंबईत संजय राऊतांच्या लेकीच्या विवाहाची चर्चा सुरु असताना इकडे सुवर्णनगरी जळगावातही एका मंत्र्यांच्या घरी सोन्याच्या पावलांनी सुनबाई येतेय. राऊतांची कन्या पूर्वशीची जशी चर्चा आहे, तशी जळगावातल्या सुनबाई प्रेरणाच्या निखळ सौंदर्यानं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. जळगावचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ पुत्र विक्रम पाटील यांचा आज विवाह सोहळा संपन्न होतोय. चोपडा तालुक्यातील शेतकरी सनपुले भगवान भिका पाटील यांची सुकन्या प्रेरणा हिच्यासोबत विक्रम पाटील विवाह बंधनात अडकले जाणार आहेत.

कोण आहे प्रेरणा पाटील?

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी सून म्हणून जाणारी ही कन्या अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबातील आहे. प्रेरणा पाटील हिने बीएससी कंप्यूटरचे शिक्षण घेतले आहे. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव विक्रम हे बीई (मेकॅनिकल) आहेत. विक्रम हे व्यावसायिक आहेत. प्रेरणाचे वडील म्हणजेच गुलाबराव पाटील यांचे होणारे व्याही सनपुले भगवान भिका पाटील हे यात्रा केबल्स कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामाला आहेत. घरची शेती सुद्धा ते सांभाळतात. मंत्र्यांचा मुलगा आणि शेतकरी कुटुंबातील लेक असा विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी  विविध मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. आज सोमवारी सायंकाळी सात वाजता हे लग्न पार पडेल. या लग्नाला अनेक दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे.

विक्रम पाटील आणि प्रेरणा पाटील

14 मंत्र्यांची उपस्थिती

स्वतः गुलाबराव पाटील हे सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या मुलाचा विवाहदेखील साध्या पद्धतीने होत आहे. चोपडा तालुक्यातील साईबाबा मंदिरात हा लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला आहे. लग्नसोहळा साधा असला तरीही या सोहळ्यात 14 मंत्री उपस्थित राहणार आहेत. यात आ. छगज भुजबळ, जंयत पाटील,नवाब मलिक, अब्दुल सत्तार, उदय सावंत, बाळासाहेब थोरात, सुनील केदार, आदिती तटकरे, संदिपान भुमरे, जितेंद्र आव्हाड, संजय बनसोडे आदी दिग्गज मंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत.

हळदीच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांनी धरला ठेका

जळगाव लग्नसोहळा  म्हटलं की,  नृत्य , गाणे वाजवणे आलंच. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही रविवारी आपल्या लहान चिरंजीवाच्या लग्नसोहळ्यानिमित्ताने हळदीच्या कार्यक्रमात ठेका धरत सर्वांचेच लक्ष वेधले. अहिराणी भाषेतील गीतांवर नृत्य करणार्या पालकमंत्र्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

 

इतर बातम्या-

Photo : शार्दुल ठाकुरचा गर्लफ्रेन्ड मितालीसोबत साखरपुडा, लवकरच लग्नच्या बेडीतही अडकणार

Anil parab : हिवाळी अधिवेशनच्या तारखा ठरल्या, लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांनाच अधिवेशनात प्रवेश