Anil parab : हिवाळी अधिवेशनच्या तारखा ठरल्या, लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांनाच अधिवेशनात प्रवेश

यंदाच्या हिवाळी अधिवेशाची तारीख संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी जाहीर केली आहे. 22, 23, 24 असा कार्यक्रम नक्की झाला आहे, दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर असा कार्यक्रम ठरला आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिलीय.

Anil parab : हिवाळी अधिवेशनच्या तारखा ठरल्या, लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांनाच अधिवेशनात प्रवेश
विधीमंंडळ अधिवेशन

यंदाच्या हिवाळी अधिवेशाची तारीख संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी जाहीर केली आहे. अधिवेशनाचा कालावधी किती अेसल हे मात्र अजूनही ठरलं नाही. 24 डिसेंबरला अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात येईल अशी माहिती अनिल परब यांनी दिलीय. यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात नाही तर मुंबईतच होईल अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

22 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन 

22, 23, 24 असा कार्यक्रम नक्की झाला आहे, दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर असा कार्यक्रम ठरला आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिलीय. यंदाचं हिवाळी अधिवेशन किती दिवसांचं असेल हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. या अधिवेशनात 12 बिले, 11 विधेयके मांडली जातील.अधिवेशनात प्रश्नोत्तरे देखील घेतली जातील, अशी माहिती परबांनी दिलीय. अधिवेशन वाढवण्याचा निर्णय 24 डिसेंबरला होईल.

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन मुंबईतच 

दरवेळी हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतलं जातं, मात्र  मुख्यमंत्री स्वतः अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याने मुंबईत अधिवेशन घेतले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रियेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. अर्थसंकलपीय अधिवेशन नागपुरला व्हावे अशी विरोधकांची मागणी होती, उपमुख्यमंत्र्यांनी  सकारात्मकता दाखवली ,मात्र मुख्यमंत्र्यांची तब्येत बघता हे अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिलीय.

अधिवेशनात फक्त यांनाच प्रवेश

नव्या कोरोना व्हेरिएंटवर आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे, अधिवेशनात ज्यांचे दोन डोस झाले असतील, त्यांनाच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे अधिवेशनात किती सदस्य उपस्थित असतील हेही सांगता येत नाही. अधिवेशनात हजेरी लावण्यासाठी आरटीपीसीआर टेस्टदेखील बंधनकारक असणार असल्याचं परबांनी सांगितलंय.

एसटीच्या संपाबाबत परब काय म्हणाले?

एसटीच्या संपावर बोलताना अनिल परब म्हणाले, जो कुणी नेता एसटी सपाची जबाबदारी घेतो, त्याने कामगारांच्या नुकसानाची देखील जबाबदारी घ्यायला हवी. विलीनीकरनावर समिती व्यतिरिक्त कुणीही निर्णय घेऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. समितिला 12 आठवड्याची मुदत दिली आहे, तोपर्यंत संप मागे घ्यावा. कोणी भावना भडकवत असेल तर तुमचे नुकसान होत आहे, असं आवाहनही त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांंना केलंय. लोकांना एसटीची गरज आहे. शाळा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे शाळकरी विध्यार्थ्यांना एसटीची गरज आहे. 18 हजार कर्मचारी सेवेत आलेले आहेत. 1 हजार 25 बसेस बाहेर पडलेले आहेत, अशी माहितीही यावेळी परबांनी दिली.

डेल्टापेक्षा ओमिक्रॉन तब्बल 6 पट बलशाली, त्याची कोणती आहेत लक्षणे, घ्या जाणून…

Purvashi Raut Wedding | लग्नसोहळ्यात राऊतांच्या लेकीची ग्रँड एंट्री, नवरदेवाचीही विंटेज कारमधून वरात!

VIDEO: एसटी कामगारांच्या संपात का गेले नाही?; वाचा, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Published On - 3:22 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI