Purvashi Raut Wedding | लग्नसोहळ्यात राऊतांच्या लेकीची ग्रँड एंट्री, नवरदेवाचीही विंटेज कारमधून वरात!

Sanjay Raut daughter Purvashi Raut Wedding : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊत (Purvashi Raut) हिचा विवाहसोहळा आज (29 नोव्हेंबर) संपन्न झाला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांचे चिरंजीव मल्हार (Malhar Narvekar) यांच्यासोबत पूर्वशीने सात फेरे घेतले आहेत.

Purvashi Raut Wedding | लग्नसोहळ्यात राऊतांच्या लेकीची ग्रँड एंट्री, नवरदेवाचीही विंटेज कारमधून वरात!
Purvashi Wedding
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 3:02 PM

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊत (Purvashi Raut) हिचा विवाहसोहळा आज (29 नोव्हेंबर) संपन्न झाला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांचे चिरंजीव मल्हार (Malhar Narvekar) यांच्यासोबत पूर्वशीने सात फेरे घेतले आहेत. या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार, राज ठाकरे, बाला नांदगावकर, नितीन सरदेसाई, छगन भुजबळ अशा दिग्गज नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

सध्या राजकाणातील मुसद्दी नेता म्हणून ओळख असलेले राऊतही आपल्या लेकीचा हट्ट पुरवण्यात तिचा लाड करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी स्पष्टपणे दिसत आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.

वधू-वराची धमाकेदार एंट्री

या लग्नसोहळ्यात पूर्वशी आणि मल्हार यांची एंट्री देखील धमाकेदार होती. पूर्वशीच्या आगमनाला अनेक वाजंत्री सज्ज होते. अगदी राजकुमारी प्रमाणे तिने या सोहळ्यात एंट्री केली. तर, नवरदेव मल्हार यांनी देखील एका विंटेज गाडीतून मांडवात एंट्री घेतली.

संजय राऊतही भावूक

बापासाठी लेकीचं लग्न म्हणजे ओठांवर हास्य ठेवून डोळ्यांच्या ओलावणाऱ्या कडा हळूच लपवण्याचा प्रसंग. तिच्या लहानपणापासूनच्या प्रत्येक आठवणीत हरवण्याचा क्षण. संजय राऊत आणि राऊत कुटुंबीयही हास्य आणि आनंदाच्या अशाच सोनेरी क्षणात रंगून गेले आहे.  आपल्या लाडक्या प्रिन्सेसच्या लग्न सोहळ्यात कशाचीही कमी पडू नये याची राऊत खबरदारी घेत आहेत.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत आज (29 नोव्हेंबर) विवाहबंधनात अडकली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह झाला आहे.

प्रत्येक बापासाठी आपल्या लेकीचं लग्न खास अन् प्रत्येक लेकीसाठी आपला बाप ‘किंग’च असतो. तिच्यासाठी तो एक पर्वताएवढा आधारही असतो. पण अशा कणखर पर्वतालासुद्धा हळवं मन असतं. बाप-लेकीच्या अशाच अलवार नात्याची झलक राजकारणातील किंगमेकर आणि त्यांच्या लेकीमध्ये दिसून आलीय. राऊत कुटुंब या आनंदसोहळ्यात दंग आहे. सध्या संजय राऊत आणि त्यांची मुलगी पूर्वशी यांच्यातील अल्लड नात्याची झलक पाहायला मिळाली आहे.

हेही वाचा :

Purvashi Raut Wedding | लेक चालली सासरला… संजय राऊतांच्या लाडक्या लेकीचा शाही विवाह सोहळा!

Purvashi Raut Wedding | संजय राऊतांच्या लाडक्या लेकीच्या लग्नात शरद पवार-राज ठाकरेंसह दिग्गज नेत्यांची हजेरी!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.