हिंदुस्थान समजून घ्यायचा असेल तर, ही संस्कृती तुम्हाला माहितीच पाहिजे, राहुल गांधींनी इतिहासच सांगितला…

| Updated on: Nov 20, 2022 | 4:20 PM

तुमची भाषा, तुमचं जगणं वेगळं असलं तरी तुमची ताकद जास्त मोठी आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी आदिवासींना दिला आहे.

हिंदुस्थान समजून घ्यायचा असेल तर, ही संस्कृती तुम्हाला माहितीच पाहिजे, राहुल गांधींनी इतिहासच सांगितला...
Follow us on

बुलढाणाः काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रातील जामोदमध्ये आली असताना आदिवासी समाजाबरोबर त्यांनी संवाद साधत त्यांनी आपल्या आजीची म्हणजेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आठवण करुन दिली. त्यावेळी त्या आम्हाला सांगत होत्या की, येथील आदिवासी हे देशाचे मूळ मालक आहेत. त्यामुळे हिदूस्थान समजून घ्यायचा असेल तर आधी आदिवासी लोकांच्या संस्कृती आणि परंपरा शिकल्या पाहिजेत असं मत राहुल गांधी यांनी यावेळी मांडले. ते म्हणाले की, या भारतभूमीवर आदिवसी यांनीच पहिला पाय ठेवला असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आदिवासी समाजासाठी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वनवासी हा शब्द वापरला होता. मात्र त्याबद्दल बोलत राहुल गांधी म्हणाले की, आदिवासी म्हणजे या धरतीचे मालक तर वनवासी म्हणजे जंगलामध्ये राहतात त्यांना वनवासी म्हणतात असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भारतभूमीवर आदिवासी समाजानेच पहिला पाय ठेवला आहे. त्यामुळे तेच या देशाचे मूळ मालक आहेत. त्यामुळे येथील प्रत्येक आदिवासी नागरिकांना शिक्षण, रोजगार, आणि आरोग्याचे अधिकार हे मिळालेच पाहिजे असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता जळगाव जामोदमध्ये आली असताना ज्यांच्या नेतृत्त्वाखाली ही यात्रा सुरू आहे, त्या राहुल गांधी यांनी आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत सभा घेतली.

यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांबरोबर संवाद साधला. राहुल गांधी यांचे आगमन होताच ढोल वाजवून त्यांचे ,स्वागत करण्यात आले.

आदिवासी समाज आणि संस्कृती विषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आदिवासी म्हणजे संस्कृती आणि परंपरा आहे. त्याला एक इतिहासही असल्याचे त्यांनी सांगितले.

तुमची भाषा, तुमचं जगणं वेगळं असलं तरी तुमची ताकद जास्त मोठी आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी आदिवासींना दिला आहे.

पेसा कायद्याविषयी बोलताना ते म्हणाले की, पेसा कायदा आणि वन अधिकार युपीए सरकारने दिले आहेत. मात्र या कायद्याला आपण कमजोर होऊ देणार नाही.

आमचे सरकार आल्यानंतर जेवढा त्यांनी या धोरणांना कमजोर केलं आहे, त्यापेक्षा जास्त मजबूत करू हे जे धोरण बनवलं आहे, त्यापेक्षा अजून हे धोरण मजबूत करु असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

भारतातील आज जे सरकार आहे. ते देशात द्वेष पसरवत आहे. त्यासाठी ही भारत जोडो यात्रा असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. जो देश महिलांचा सन्मान करू शकत नाही तो पुढे जाऊ शकत नाही.

कधी कधी महिलांवर अत्याचार होतात तेव्हा भाजपवाले म्हणतात यात पुरुषाची चूक नाही महिलेची चूक असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.