तणाव वाढल्यानंतर सुषमा अंधारेंची अनोखी शक्कल, पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यानंतरही सभा होणारच!

सुषमा अंधारे या ऑनलाईन सभा घेणार आहेत. याचाच अर्थ ते ऑनलाईन मुक्ताईनगरच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

तणाव वाढल्यानंतर सुषमा अंधारेंची अनोखी शक्कल, पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यानंतरही सभा होणारच!
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 7:54 PM

जळगाव : शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या मुक्ताईनगर येथील सभेला पोलिसांनी मनाई केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. विशेष म्हणजे पोलिसांनी सुषमा अंधारे यांना थेट नजरकैदेत ठेवलं. त्यामुळे तणाव आणखी वाढला. पण या तणावावर स्वत: सुषमा अंधारे यांनी मार्ग काढला. सुषमा अंधारे या ऑनलाईन सभा घेणार आहेत. याचाच अर्थ ते ऑनलाईन मुक्ताईनगरच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

जळगावात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड राजकीय धुमाकूळ सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वातील महाप्रबोधन यात्रा गेल्या तीन दिवसांपासून जळगावात ठाण मांडून आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी या प्रबोधन यात्रेची सभा होत आहे.

या सभांमध्ये भाषण करताना सुषमा अंधारे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर प्रचंड निशाणा साधत आहेत. पण सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज मुक्ताईनगर येथे आली तेव्हा त्यांच्या सभेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आलीय. कारण त्यांच्या कार्यक्रमाजवळ शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केलाय. त्यामुळे पोलिसांनी अंधारेंना त्याठिकाणी कार्यक्रम घेण्यास मनाई केलं आहे.

हे सुद्धा वाचा

असं असताना सुषमा कार्यक्रम घेण्यावर ठाम होत्या. पण पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवलं. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. या प्रकरणी तणाव वाढत असल्याने सुषमा यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर टीका करत आपण ऑनलाईन भाषण करणार असल्याचं स्पष्ट केलं.

‘गुलाब भाऊ आप भी क्या याद करोंगे’

“माझा पोलीस कर्मचाऱ्यांवर अजिबात राग नाही. कारण ते बिचारे आदेशाचे पालन करत आहे. माझा आदेश देणाऱ्या त्या व्यक्तीवर आक्षेप आहे. तुम्ही सत्तेचा गैरवापर करत आहात. एकीकडे तुम्ही मला तीन महिन्यांचं बाळ म्हणत आहात. पण याच तीन महिन्याच्या बाळाने तुमची झोप उडवली आहे. तुम्ही हादरला आहात. तुम्ही घाबरला आहात. म्हणून तुम्ही माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करताय. पण गुलाब भाऊ आप भी क्या याद करोंगे, लोग क्सर पिठ पिछे बात करते है, लेकीन मै वो शेरनी हुँ की आपके इलाके में आकर आपको ललकार रहीं हुँ”, असं सुषमा अंधारे म्हणाले.

“माझा पोलिसांवर अजिबात राग नाही. त्यांच्याबद्दल माझी कसलीही तक्रार नाही. ते फक्त आदेशाचं पालनन करत आहेत. मी कायद्याच्या चौकटीत राहणारी आहे. मी कदाचित येथून जोरजबरदस्ती करुन निघून जाऊ शकते. पण त्यामुळे जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि कुणाला इजा झाली तर ते माझ्या लौकिकाला साजेसं नाही. मी माझ्या आणि पक्ष नेतृत्वाच्या लौकिकाला साजेसंच वागलं पाहिजे. राहिला प्रश्न सभेचा काय तर सभेची लिंक तुम्हाला मिळेल. सभा आॉनलाईन घेणार. त्यावर ते आक्षेप निश्चितच घेणार नाहीत”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

Non Stop LIVE Update
कल्याणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग अन् रस्त्याची नदी; 'या' महामार्ग ठप्प
कल्याणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग अन् रस्त्याची नदी; 'या' महामार्ग ठप्प.
बस स्थानक की स्विमींग पूल, तुफान पावसानं रायगडला झोडपलं, बघा व्हिडीओ
बस स्थानक की स्विमींग पूल, तुफान पावसानं रायगडला झोडपलं, बघा व्हिडीओ.
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा.
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप.
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी.
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?.
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण...
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण....
अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ, शाहरुखसह मित्रांना कोटींची भेट
अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ, शाहरुखसह मित्रांना कोटींची भेट.
'जगबुडी'नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर, खेड-दापोली मार्ग बंद
'जगबुडी'नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर, खेड-दापोली मार्ग बंद.
विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?
विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?.