विजय चौधरींच्या राजकारणातील एन्ट्रीसाठी प्रेक्षकांमधून विचारणा? कुस्ती मारल्यावर महाजनांना घेतलं खांद्यावर!

| Updated on: Feb 11, 2024 | 11:44 PM

जळगावमध्ये झालेल्या 'नमो कुस्ती महाकुंभा'मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनीही मैदान मारलं. यावेळी कुस्ती शौकिन आणि विजय हजारे समर्थकांमधून चौधरींच्या राजकीय एन्ट्रीची विचारणा झाली. मैदान मारल्यावर विजय चौधरींनी मंत्री गिरीश महाजन यांना उचलून घेतलं होतं.

विजय चौधरींच्या राजकारणातील एन्ट्रीसाठी प्रेक्षकांमधून विचारणा? कुस्ती मारल्यावर महाजनांना घेतलं खांद्यावर!
Vijay Chaudhary girish Mahajan Namo kusti mahakumbh
Follow us on

जळगाव : भारतातील सर्वात मोठी कुस्ती दंगल ‘नमो कुस्ती महाकुंभ’चं आयोजन जळगाव जिल्ह्यातील पारनेरमध्ये करण्यात आलं होतं. कुस्तीच्या आखाड्यात नामवंत मल्लांच्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या कुस्त्या पाहायल्या मिळाल्या. या कुस्त्यांचं आयोजन भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी केलं होतं. जळगावसह राज्यातून कुस्ताशौकीन या कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. सर्व कुस्त्या निकाली होत्या, जळगाव किंग ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि डीवायएसी विजय चौधरी यांनी कुस्ती जिंकल्यावर गिरीश महाजन यांना आपल्या खांद्यावर उचलून घेतलं होतं. कुस्तीच्या आखाड्यावेळी राजकारणाची एन्ट्रीची चर्चा आखाड्याच्या ठिकाणी झाली. नेमकं काय झालं?

विजय चौधरी करणार राजकारणात एन्ट्री??

विजय चौधरी आखाड्याजवळ असताना कॉमेट्री करणाऱ्यांना प्रेक्षकांमधून निरोप आला की विजू भाऊ यांनी राजकारणात एन्ट्री करावी.  त्यानंतर त्यांनीही पुकारत विजय चौधरी यांनी राजकारणात एन्ट्री करावी, असा निरोप प्रेक्षकांमधून आल्याचं सांगितलं. त्यावेळी माईकवर कोणीतरी, आयजी झाल्यावर पाहू, असं म्हणालं. त्यामुळे विजय चौधरी यांच्या समर्थकांमध्ये राजकीय एन्ट्रीच्या चर्चा होत आहेत.

विजय चौधरींनी महाजनांना घेतलं खांद्यावर

विजय चौधरी यांची मुस्तफा खान या जम्मू केसरी असलेल्या मल्लासोबत कुस्ती लागली होती. मुस्तफा खान याने चिवट झुंज दिली. शेवटी चौधरींना आपल्या पिटाऱ्यातील खास डाव टाकत मुस्तफा खान याला आस्मान दाखवलं. विजय चौधरी यांच्या कुस्तीवेळ स्वत: गिरीश महाजन पंच म्हणून आखाड्यात दिसले. विजयी झाल्यावर विजय चौधरींना महाजन यांना आपल्या खांद्यावर घेतलेलं पाहायला मिळालं. विजय चौधरींनी मैदान मारलं खरं पण त्यांच्या विजयापेक्षा राजकारणाच्या एन्ट्रीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असलेली पाहायला मिळत आहे.

सिकंदर परत एकदा ठरला ‘बाजीगर’

फुलगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेचा मानकरी सिकंदर शेख याची शेवटची कुस्ती झाली. कुस्ती शौकिन या कुस्तीची प्रतीक्षा करत होते. शेवटी सिकंदरची मुळचा जम्मूचा असलेल्या भारत केसरी  बिनिया मीन याला पराभूत करत आपला लौकिक ठेवला.