एका शिक्षकाच्या मुलाकडं करोडोची संपत्ती कुठून आली, एकनाथ खडसे यांचं या नेत्याला चॅलेंज

मला विश्वास आहे, यांना दूध उत्पादक धडा शिकवतील, असा इशारा दिला.

एका शिक्षकाच्या मुलाकडं करोडोची संपत्ती कुठून आली, एकनाथ खडसे यांचं या नेत्याला चॅलेंज
एकनाथ खडसे
| Edited By: | Updated on: Nov 28, 2022 | 5:29 PM

जळगाव – एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. खडसे म्हणाले, मला गिरीश महाजनांची कीव येते, त्यांचं सरकार आहे. त्यांनी मी जे काही केलं आहे त्याची चौकशी करावी. माझं त्यांना आव्हान आहे एका शिक्षकाच्या मुलाकडे करोडो रुपयांची मालमत्ता कशी आली. माझं 40 वर्षांचं राजकीय जीवन जनतेसमोर आहे. सूडबुद्धीने माझा छळ केला. खोटे गुन्हे दाखल केले. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. मला विश्वास आहे, यांना दूध उत्पादक धडा शिकवतील, असा इशारा दिला.

पैशाच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्याचा यांचा डाव आहे. पण जनता हा डाव हाणून पाडेल. आतापर्यंत गिरीश महाजन का बोलले नाहीत.  त्यांच्यावर कोणाचा दबाव होता, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

अख्या महाराष्ट्राला माहिती आहे, खडसे म्हणजे भाजप. जामनेरमधल्या नगरपालिकेतील गैरव्यवहाराच्या तक्रारी झाल्या. पण त्यांची चौकशी का होत नाही. पेन ड्राईव्ह दिला आहे तर चौकशी होऊ द्या. चौकशीत सत्य समोर येईल. माझा काय संबंध आहे ते पण समोर येईल.

मराठा समाजाच्या शैक्षणिक संस्थेच्या जागेवर गिरीश महाजन यांनी अतिक्रमण केलं. जामनेर ते चाळीसगावपर्यंतच्या शैक्षणिक संस्था कशा हडप केल्या हे सर्वांना माहिती आहे, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

पेन ड्राईव्ह आहे. चौकशीत समोर येईल. मराठा समाजाच्या जागेवर अतिक्रमण केले. बाळू पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला. सगळ्या शैक्षणिक संस्था कशा हळप केल्या. दूध उत्पादक संघ आणि त्यात केलेलं काम यावर अधिक बोलणार आहे.