AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil | तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील, मनोज जरांगे यांचं धक्कादायक विधान, भुजबळ यांना इशारा

मनोज जरांगेंनी पुन्हा भुजबळांना खडे बोल सुनावत टीका केली आहे. तू गप्प बस नाहीतर टपकन वर जाशील, असं धक्कादायक विधान करत त्यांनी भुजबळांना इशारा दिला.

Manoj Jarange Patil | तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील, मनोज जरांगे यांचं धक्कादायक विधान, भुजबळ यांना इशारा
| Updated on: Feb 03, 2024 | 11:30 AM
Share

संजय सरोदे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी,जालना, अंतरवाली सराटी | 3 फेब्रुवारी 2024 : मुंबईपर्यंत मोर्चा काढून मराठा आरक्षणाचा अध्यादेश मिळाल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे अजूनही काही गोष्टींवर आक्रमक आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा आणि मागच्या दारातून मराठ्यांना आरक्षण दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. त्या दोघांमधील वाद अद्याप शमलेला नसून आता मनोज जरांगेंनी पुन्हा भुजबळांना खडे बोल सुनावत टीका केली आहे. ‘तू ओबीसींचं वाटोळं केलं आहे, आम्ही ओबीसींचे वाटोळे नाही होऊ देणार ‘ अशा शब्दांत मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला. तू गप्प बस नाहीतर टपकन वर जाशील, असं धक्कादायक विधान करत त्यांनी भुजबळांना इशारा दिला.

काय म्हणाले मनोज जरांगे ?

टीव्ही 9 शी बोलताना मनोज जरांगेनी भुजबळांवर कडाडून टीका केली. ‘ आता आम्ही ओबीसी मध्ये गेलो आहेत, त्यांना स्थान नाही. मी तुला सांगतो, तू नादी लागू नको, गोरगरीब ओबीसींचे वाटोळं करू नकोस. मराठे ओबीसी आरक्षणात गेले आहेत. आता हेच ओबीसी बांधव त्याला ( भुजबळ) म्हणत आहेत तू काय कामाचा आहेस ? आता ओबीसीत सर्व आता गेले आहेत आणि तुला बाहेर निघायची वेळ आली आहे. आम्ही सर्व मिळून तुला बाहेर फेकतो असे म्हणत आहे.’ अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

तू गप्प बस नाही टपकन वर जाशील

तू ओबीसीचे वाटोळे केले आहे, पण आम्ही ओबीसींचे वाटोळे नाही होऊ देणार. तुझं वय झालं आहे आणि या वयात एव्हडा लोड झेपत नाही. तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील अशा शब्दात मनोज जरांगे यांनी भुजबळांना इशारा दिला. गप्प रहा, यडपट माणूस आहे. हे कसे ओबीसीच्या हाताला लागले, ओबीसींचे वाटोळे करत आहे.

मला म्हणतो उपोषण करू नको, तू नको करू आंदोलन, गप्प पड एका जागी. तू माझ्या नादी लागू नको, तुझे वय झाले आहे. तुझ्या वयानुसार आम्ही तुझा आदर करू. तू गप्प बसला तर आम्ही तुझा शंभर टक्के आदर करू. पण जर गप्प बसला नाही तर तुला मी काही सोडत नाही, असेही मनोज जरांगेंनी भुजबळांना सुनावले.

सोमवारी घेणार पत्रकार परिषद

यावेळी मनोज जरांगे यांनी आपण सोमवारी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचेही नमूद केले. जे समाजासमोर बोंबलत आहेत, की मराठा समाजाला मुंबईत गेल्यानंतर काय मिळाले ते मी स्पष्ट करणार आहे. 70 वर्षात कोणी कोणी काय मिळु दिले नाही हे सांगणार आहे. आता समजाला मिळतंय, तर 75 वर्षात ज्यांनी समाजाला का मिळू दिले नाही आणि त्यांच्या पोटात का दुखत आहे याचं कारणही सांगणार आहे, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं . मी गोरगरीब मराठ्यांचे काम का करू नये..? यांची का इच्छा आहे हे ही सोमवारी सांगणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच