Devendra Fadnavis : मुख्यमंत्री कार चालवतात, भगवान सरकार चालवतं, जालन्यातल्या आक्रोश मोर्चातून फडणवीसांची फटकेबाजी

| Updated on: Jun 15, 2022 | 3:26 PM

हा भाजपचा मोर्चा नाही हा जालन्याचा आक्रोश (Marathwada Water Issue)आहे. भर उन्हा या मता भगिनी रस्त्यावर उतरल्या आहेत. या जालन्यात आम्हाला पाणी पाहायला मिळेल का? असा सवाल यांच्याकडून विचारण्यात येत आहे, असेही फडणवीस म्हणाले. 

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री कार चालवतात, भगवान सरकार चालवतं, जालन्यातल्या आक्रोश मोर्चातून फडणवीसांची फटकेबाजी
मुख्यमंत्री कार चालवतात, भगवान सरकार चालवतं, जालन्यातल्या आक्रोश मोर्चातून फडणवीसांची फटकेबाजी
Image Credit source: tv9
Follow us on

जालना : गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्यांनी फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वात जलआक्रोश मोर्चा काढला होता. मात्र गेल्या औरंंगाबादच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी (Cm Uddhav Thackeray) या आक्रोश मोर्चाला भाजपचा सत्तेचा आक्रोश म्हणून संबोधलं होतं. आजही भाजप नेत्यांनी जालन्यात असाच मोर्चा काढला. या मोर्चातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ कार चालवतात. आणि हे सरकार भगवान चालवतो म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना कोपरखिळ्या मारल्या आहेत. तसेच सरकार हे इश्वर भरोसे चाललं आहे. आता पाणी मुख्यमंत्र्यांनी नाही इश्वराने दिलं. हा भाजपचा मोर्चा नाही हा जालन्याचा आक्रोश (Marathwada Water Issue)आहे. भर उन्हा या मता भगिनी रस्त्यावर उतरल्या आहेत. या जालन्यात आम्हाला पाणी पाहायला मिळेल का? असा सवाल यांच्याकडून विचारण्यात येत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री झोपा काढतात का?

तसेच आम्ही जालन्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन तयार केलं नसतं तर थेंबभर पाणी पाहायला मिळालं नसतं. आम्ही क्षणाचाही विचार न करता कोट्यवधींचा निधी पाण्यासाठी दिला मात्र नवीन सरकारमध्ये सर्व काही ठप्प झालं, या ठाकरे सरकारला स्थगिती देण्याशिवाय काही येत नाही. आत्ता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना विचारा तुम्ही काय झोपा काढताय का? कोट्यवधी देऊन थेंबभर पाणी जालण्याच्या नळाला येत नाही?  तर तुम्हीला राज्यकर्ते म्हणून घ्यायचा अधिकार नाही. जिथे जल आक्रोश आहे तिथे तिथे भारतीय जनता पार्टी आहे. आमच्या माता भगिनींना पाणी मिळावं यासाठी आम्ही संघर्ष करणार आहे. जनतेच्या आक्रोशाची दखल जे घेत नाहीत त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय जनता राहत नाही, असे म्हणत फडणवीसांनी थेट सरकारला इशारा दिला आहे.

सरकारने सर्व योजनांची हत्या केली

गेल्या सरकारमध्ये आपण जे टेंडर काढले त्यांचे काम सुरू केलं. या सरकारने तेच प्रकल्प बंद करण्याचे काम केलं, आम्ही समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं आणि खोरेच दुष्काळमुक्त करायचं ठरवलं, हा प्लॅन तयार केला, त्याला मान्यता देऊन जीआर काढले. मात्र या सरकारने त्यालाही खोळंबा घातला, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे. तर . आपण मागेल त्याला शेततळं देण्याच योजना आणली तसेच पिण्याच्या पाण्याच्या असो, सिंचनाच्या असो सर्व योजनांची हत्या करण्याचं काम या सरकारनं केलं, असाही आरोप त्यांनी केला आहे.

मराठवाड्याची कवच कुंडलं मारून टाकली

एवढेच नाही तर या सरकारने वैधानिक विकास मंडळांची हत्या केली, राज्यपालांना आत्ता अधिकार उरला नाही, मराठवाड्याची कवचकुंडलं या सरकारने मारून टाकली. हे सत्तेत खूश आहेत, मालपाणी कमवण्यात हे मगशूल आहेत. गिरबांची शेतकऱ्यांची अवस्था यांना पाहायची नाही. माझ्या पाच वर्षाच्या काळात प्रत्येक वेळी आम्ही पैसा दिला. योजना दिल्या, जे मागितलं ते दिलं. मात्र गेल्या अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री तर या ठिकाणी आले नाही, ते तर सोडा एक पैसाही मिळाला नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.