AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात ‘सार्वजनिक न्यास नोंदणी’ च्या नव्या इमारतीचे उद्घाटन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री राजेश टोपेंची ऑनलाइन उपस्थिती

जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची नवीन इमारत लोकांना आपली वाटली पाहिजे.  सर्वसामान्य माणसाला समाधानी ठेवा एवढीच अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हटले.

जालन्यात 'सार्वजनिक न्यास नोंदणी' च्या नव्या इमारतीचे उद्घाटन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री राजेश टोपेंची ऑनलाइन उपस्थिती
जालन्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची नवी इमारत
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 12, 2022 | 2:28 PM
Share

जालना: जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी), मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare),  धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे,  धर्मादाय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲङ प्रदीप कुलकर्णी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांच्यासह विधी व न्याय विभागाचे अधिकारी, धर्मदाय वकील संघटनचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सर्वसामान्य माणसाला समाधानाचे आयुष्य जगता यावे यासाठी काम करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य. त्यासाठीच धर्मादाय संस्थांच्या मदतीसाठी एक परिपूर्ण कार्यालय असणे जनतेसाठी हितकारक आहे.’

Jalna Program

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री राजेश टोपे आणि आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत उद्धाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का म्हणाले?

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, एखादं पद, अधिकार लाभला की  मी बरा, माझे कार्यालये बरे असं न  समजता  मिळालेल्या अधिकाराचा, पदाचा समाजासाठी वापर करणे गरजेचे आहे.  आवश्यक तिथे पाठपुरावा करून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काही मागण्या करणे, तशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे नाही.  सुविधांशिवाय कामं कशी होणार? जनतेची सेवा सुरळितपणे होण्यासाठी सोयी-सुविधा आणि मनुष्यबळांनी परिपूर्ण कार्यालय असणे आवश्यक आहे. कोविड काळात जास्तीत जास्त चांगली सेवा सर्वसामान्य माणसाला देता आल्याने जनतेचे प्राण आपण वाचवू शकलो. त्यामुळे  या कामावर होणाऱ्या आरोपांना घाबरू नये. स्वत: राजेश टोपे या कामात पाय रोवून उभे राहिले..जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची नवीन इमारत लोकांना आपली वाटली पाहिजे.  सर्वसामान्य माणसाला समाधानी ठेवा एवढीच अपेक्षा.’

पालकमंत्री व आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

या कार्यक्रम प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, अत्यंत सुंदर, सुबक वास्तू जी जालन्याच्या वैभवात भर टाकणारी आहे. धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे काम उत्तम व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या नव्या इमारतीत  अनेक सुविधा आपण याअंतर्गत उपलब्ध करून दिल्या आहेत. ट्रस्ट हॉस्पीटलच्या बऱ्याच तक्रारी. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आवश्यक, असे झाल्यास गरीब माणसाला त्याचा हक्क मिळेल आणि ज्या उद्देशाने ट्रस्टला जागा किंवा इतर सुविधा दिलेल्या असतात तो  उद्देशही पूर्णत्वाला जाईल. धर्मदाय आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या.

इतर बातम्या-

Mohammed Shami IPL 2022 Auction: मोहम्मद शमीसाठी चार टीम भिडल्या, नवख्या गुजरात टाइटन्स मारली बाजी

Shreyas Iyar | बाबांची इच्छा म्हणून क्रिकेटर झाला, श्रेयसला IPLनं मालामाल केला! श्रेयसच्या इंटरेस्टिंग गोष्टी

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!