Manoj Jarange: मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार? दुसर्यांदा परवानगी नाकारल्यानंतर मोठी घोषणा, आंतरवाली सराटीत वेगवान घडामोडी
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि प्रशासनामध्ये मुंबईत आंदोलनासाठी परवागनी नाट्य रंगले आहे. मुंबई पोलिसांनी दोनदा परवानगी अर्ज नाकारल्यानंतर जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

स्वप्नील उमप, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि प्रशासनात मुंबईतील मराठा मोर्चा परवानगीवरून वाद पेटला आहे. आझाद मैदान पोलिसांनी दोनदा त्यांचा परवानगी अर्ज फेटाळला. आता तिसऱ्यांदा त्यांनी अर्ज केला आहे. आज 15 सप्टेंबर रोजी मुंबईसाठी ते कूच करणार होते. 19 सप्टेंबर रोजी आझाद मैदानात त्यांनी आंदोलनाची, उपोषणाची हाक दिली होती. त्यानंतर आज आंतरवाली सराटीत मोठ्या घडामोडी घडल्या. जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला.
एकटेच मुंबईला जाणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक आमरण उपोषणाचा आजचा 18 वा दिवस आहे. जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने आंतरवाली सराटीतून कूच करणार आहेत. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील आता तिसऱ्यांदा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. दुपारी मुंबईकडे जाण्यासाठी ते कूच करतील अशी माहिती समोर येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने मी एकटाच जाणार मराठा बांधवांनी येऊ असं आवाहन जरांगे पाटील यांनी काल केले होते.
जरांगे पाटलांनी उपचार थांबवले
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी दुसर्यांदा परवानगी नाकारल्यामुळे जरांगे पाटलांनी उपचार घेणे आणि सलाईन घेणे बंद केले.पाटील यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचा पथक दाखल झालं होतं. मात्र आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे. डॉक्टरांकडून उपचार घेण्याची विनंती करण्यात आली होती. उपचार घेतले नाही तर सकाळपर्यंत अशक्त पणा जाणवेल असे उपस्थितांकडून सांगण्यात येत आहे.
परवानगीसाठीच्या नवीन अर्जात तो महत्त्वाचा मुद्दा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाची परवानगी पोलिसांनी दुसऱ्यांदा नाकारल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने हालचाली सुरू झाल्यात,मनोज जरांगे आणि त्यांच्या चार ते पाच सहकाऱ्यांना आंदोलनाची परवानगी मिळावी यासाठी मुंबईतील वकील बांधव परवानगी अर्ज घेऊन आझाद मैदान पोलिसांकडे गेले असल्याची माहिती जरांगे पाटलाचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे, त्यामुळे यावेळी तरी आपल्याला पोलिसांकडून परवानगी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
