Manoj Jarange: आम्हाला मुंबईच्या वेशीवर सोडा अन… मनोज जरांगे पाटील यांचे कळकळीचे आवाहन
Manoj Jarange Patil Big Appeal: मराठा आंदोलन मनोज जरांगे यांचं मुंबईतील आंदोलनाचं मुहूर्त अखेर ठरला. त्यांनी मुंबईत जाण्याचा मार्गच सांगितला. तर यावेळी मुंबईच्या वेशीवर मराठ्यांनी आम्हाला सोडायला येण्याचे आवाहन त्यांनी केलं.

मुंबईत मराठ्यांचं भगवं वादळ धडकणार हे निश्चित झालं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीत याविषयीची मोठी घोषणा केली. त्यांनी मुंबईत कोणत्या मार्गे जायचे याविषयीची माहिती दिली. त्यांनी यावेळी ज्या भागातून मराठ्यांचा हा काफिला जाणार आहे, त्या जिल्ह्यातील समाजबांधवांना मोठे आवाहन केले आहे. तर मुंबईच्या वेशीवरही मराठा समाजाने वाटी लावण्यासाठी येण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. हा सर्व मोर्चा शांततेत निघणार अल्याचे ते म्हटले. आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे हटणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
सहकुटुंब आशीर्वाद देण्यासाठी या
आता आपण ज्या मार्गावरून जाणार आहोत. आंतरवाली, शहागड, बीड, मांजरसुंबा, लिंबा गणेस या मार्गे पाटोद्याला जाऊ. या रस्त्यावरून जे मराठा बांधव मुंबईसाठी चालले आहेत. ते समाजाच्या आणि लेकराबाळांच्या अस्तित्वासाठी चालले आहेत. आम्ही ज्या रस्त्यावरून मुंबईला जात आहोत. या जिल्ह्यातील संपूर्ण लोकांनी, जे मुंबईला येणार नाहीत, येऊ शकणार नाहीत. त्यांनी या रस्त्यावर सहकुटुंब आम्हाला वाटी लावण्यासाठी यायचं आहे, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यातील तर नांदेड, हिंगोली आणि परभणीतील न येणाऱ्या मराठ्यांनी या मार्गावरती समाज बांधवांना वाटं लावण्यासाठी यायचं आहे. एक दिवस या लोकांनी जातीसाठी द्यायचा आहे. पश्चिम महाराष्ट्रानं आम्ही ज्या रस्त्यावरून चाललो, त्या जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी यायचं आणि आम्हाला वाटी लावायचं. त्यानंतर घरी जायचं.
मुंबईच्या वेशीवर सोडा आणि परत जा
मुंबईला न येऊ शकणारे मराठे, ज्यात नोकरदार, व्यावसायिक, राजकारणी, शेतकरी अथवा गरीब मराठा यांनी आम्हाला केवल आशीर्वाद देऊन त्यांच्या गावी जावे. तारीख सांगितली नाही, केवळ मार्ग सांगितला. त्या तारखेला काम बंद करा आणि भेटा. चिखलाने पाय भरलेले असतील, हातातील कामं टाकून या मार्गावर यात.
ज्या मराठा बांधवांकडे वाहनं आहेत. पण काही कारणांमुळे त्यांना मुंबईत येता येत नाही. त्यांनी केवळ आम्हाला मुंबईपर्यंत आम्हाला या वाहनातून वाटी लावायला यावं. आम्हाला मुंबईच्या वेशीवर सोडा आणि तुम्ही परत जा. आम्ही तुमच्या लेकरासाठी संघर्ष करत आहोत. ज्या वाहनातून आम्ही मुंबईत चाललो, त्यासोबतच तुमची वाहनं येऊ द्यात. आम्ही पुढं आझाद मैदानाला जातो. आमचं तुम्हाला सोपं मागणं आहे. तुमचं वाहन घरी उभं राहणार ते केवळ मुंबईच्या वेशीपर्यंत पाठवा. तुमचं दोन चार हजारांचं डिझेल जळेल. पण समाजातील मुला-मुलींचे कल्याण होईल, असे जरांगे पाटील म्हणाले.