AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगेंनी पाटलांनी उपोषणाला स्थगिती देत, भाजपला हरवण्याचा घेतला पण

भाजपचा एकही आमदार जिंकू देवू नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

जरांगेंनी पाटलांनी उपोषणाला स्थगिती देत, भाजपला हरवण्याचा घेतला पण
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jul 24, 2024 | 9:50 PM
Share

भाजपचा एकही आमदार निवडून येवू द्यायचा नाही, आणि सत्तेतून खेचणार अशी शपथ घेवून 5 व्या दिवशी, जरांगेंनी उपोषण स्थगित केलं. भाजपला कधीच सत्तेत येवू देवू नका, असं मराठा समाजाला आवाहन करत फडणवीसांची आग मीच विझवणार असा हल्लाबोलही जरांगे पाटील यांनी केला. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशानंतर आता जरांगेंचं मिशन फिक्स झालं. सत्ताधाऱ्यांची खुर्ची ओढणे आणि आमदार पाडणे. मात्र पाडण्याची भाषा केल्यानं आता भाजपचेही नेते संतापले आहेत.

2013 मध्ये, नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याच्या प्रकरणात जरांगे पाटलांच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट जारी झालंय. मात्र या मागे, गृहमंत्री फडणवीसांचाच हात असून जेलमध्ये टाकून गोळ्या घालण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे. तर कोर्टाची प्रक्रिया म्हणत, फडणवीसांनी आरोप फेटाळले आहेत.

फडणवीसांनी म्हटले की, ‘मनोज जरांगे यांची केस २०१३ ची केस आहे. यापूर्वी आधीच त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट निघतं. पण तारखेवर हजर राहिलं तर ते रद्द होते. पुन्हा ते तारखेवर गेले नाही तर त्यांचा वॉरंट रद्द होईल. आमचा त्यात काहीही संबंध नाही. मी त्यांना दोष देणार नाही. उपोषणाच्या शेवटी ते माझ्य़ा आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफी मागितली होती. उपोषणामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता असं त्यांनी सांगितलं होतं.’

आता ज्या प्रकरणात जरांगेंचं अटक वॉरंट निघालं ते प्रकरण काय तेही पाहुयात.

2013 मध्ये जालन्यात धनंजय घोरपडेंच्या ‘शंभूराजे’ नाटकाच्या 6 प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं. मनोज जरांगे, अर्जुन जाधव आणि दत्ता बहीर यांनी हे आयोजन केलं. प्रत्येक प्रयोगाला 5 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये देण्याचं आयोजकांनी कबूल केल्याचा घोरपडेंचा दावा आहे. मात्र प्रयोगाचे पूर्ण पैसे दिले नसल्याची धनंजय घोरपडेंची तक्रार आहे. पैसे न मिळाल्यानं घोरपडेंनी कोर्टात धाव घेतली. मात्र तारखेवर गैरहजर राहिल्यानं जरांगे पाटलांविरोधात पुणे न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी झालं.

जरांगेंनी, आपला मोर्चा दरेकरांकडेही वळवला. फडणवीसांसह दरेकरांनाही वठवणीवर आणतो, असा इशाराच त्यांनी दिला. आतापर्यंत उपोषणाच्या माध्यमातून जरांगे सरकारवर दबाव आणत होते. मात्र आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी जरांगेंनी केली. म्हणजेच मराठा आरक्षण, आणि सगेसोयऱ्यांची पुढची लढाई राजकीय आखाड्यात होईल.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी