AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : अखेर Blackbox सापडला, आता उलगडणार विमान अपघाताचं कारण

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी अपघात झाला. त्यात अजित दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. बारामतीजवळ हे प्लेन क्रॅश झालं, त्याचा Blackbox अखेर आता सापडला आहे. त्यातून या विमान अपघाताचं खरं कारण समोर येऊ शकतं.

Ajit Pawar Plane Crash : अखेर Blackbox सापडला, आता उलगडणार विमान अपघाताचं कारण
बारामती विमानातील Blackbox सापडला
| Updated on: Jan 29, 2026 | 12:39 PM
Share

बुधवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले अजित पवार हे मुंबईहून बारामतीला प्रवास करत असताना त्यांचे विमान लँडिंग करताना कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. याच अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅकबॉक्सचा शोध घेण्यात येत होता. विमानाचा तोच ब्लॅक बॉक्स आता सापडला आहे, त्यामुळे अपघाताचे खरे कारण उघड होईल. हा जीवघेणा अपघाता नेमका कशामुळे झाला ते आता समोर येण्यास मदत होईल.

अखेर सापडला Blackbox 

बारामतीमधील अपघातग्रस्त लियरजेट विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे, असं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातील सूत्रांनी सांगितलं. ब्लॅक बॉक्स हे असं एक उपकरण असतं की जे विमानाच्या प्रत्येक हालचालीची नोंद करते. कोणत्याही विमान अपघातानंतर, अपघाताचे खरे कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स उपयोगी ठरतो. लिअरजेट या विमानातही ब्लॅकबॉक्स होता. लेअरजेट 45 हे विमान अत्यंत कडक सुरक्षा मानकांनुसार (FAR Part 25) बनवले आहे . त्यात फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) दोन्ही आहेत, ज्यांना एकत्रितपणे “ब्लॅक बॉक्स” असं म्हटलं जातं. जरी त्याचं नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी त्याचा रंग काळा नव्हे तर नारिंगी असतो. हा बॉक्स कोणत्याही ढिगाऱ्यात किंवा कचऱ्यात अथवा घनदाड जंगलात शोधणं सोपं व्हाव म्हणून याचा रंग असा नारिंगी असतो.

कोणताही स्फोट, टक्कर, तीव्र आग, उच्च तापमान आणि पाणी यासारख्या कोणत्याही अपघातापासून वाचण्यासाठी ब्लॅक बॉक्सचे विशिष्ट पद्धतीने डिझाइन केलेलं असतं आणि ते विमानाचा डेटा साठवतं. तो डेटा मिळाल्याने विमान अपघातका झाला, त्याचं कारण समजणं सोपे होते. ब्लॅक बॉक्समधून मिळालेला डेटा भविष्यातील विमान अपघात रोखण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो. बारामतीतील विमान अपघाताचं कारण शोधण्यासाही आता हाँ ब्लॅक बॉक्स महत्वाचा ठरले. काल हे विमान धावपट्टीच्या उंबरठ्यावर पोहोचण्याआधीच कोसळलं अशी माहिती समोर आली. खाली कोसळताच स्फोट होऊन मोठी आग लागली आणि पाचही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताचा तपास सुरू आहे आणि आता ब्लॅक बॉक्स सापडला असल्यामुळे त्यात वेगाने प्रगती होण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारल करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शाह, बीजेपी अध्यक्ष नितिन नवीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. इतरही अनेक राजकीय नेते, मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार.
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर.
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार.
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला.
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतली अजित पवारांची शेवटची भेट
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतली अजित पवारांची शेवटची भेट.
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी.
दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!
दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!.