Thane : म्हणून म्हाडाची परीक्षा रद्द, पेपरफुटीवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात…

Thane : म्हणून म्हाडाची परीक्षा रद्द, पेपरफुटीवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात...
jitendra aavhad

म्हाडा पेपरफुटी प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, पोलिसांनी त्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 12, 2021 | 6:33 PM

म्हाडा पेपरफुटी प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, पोलिसांनी त्या टोळीचा पर्दाफाश केला, अशी माहिती त्यांनी दिली आहे. भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात जी टोळी कार्यरत आहे, ती उध्वस्त करायला लागेल, यात पेपरफुटी नाही तर गोपनियतेचा भंग झाला आहे. असेही ते म्हणाले आहेत.

विद्यार्थ्यांची फी परत करणार

काल रात्री पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले, त्यांच्या संभाषणात पेपरफुटीचा उल्लेख होता. महाराष्ट्रमधील सर्व दलाल एकच आहेत, खाजगी सवस्थेकडून हा प्रकार झाला, त्यामुळे यापुढे म्हाडा परीक्षा घेणार, खासगी संस्थेकडे देणार नाही अशीही माहिती त्यांनी दिली. ज्यांच्याकडून फी घेतली आहे, त्यांची फी म्हाडा परत करणार आहे. काही नालायक लोकांना थारा देऊ नये. ही परीक्षा झाली असती तर काहींवर अन्याय झाला असता. विद्यार्थ्यांचे हीत जवळचे आहे त्यामुळे मोठे रॅकेट पकडायला डिपार्टमेंट मागे लागले आहे, तसेच वशिल्यासाठी काही लोक मंत्रालयात येतात, मागच्या सरकारवेळीही एमपीएसीचा पेपर फुटला, असंही ते म्हणाले आहेत.

परीक्षेची पुढील तारीख म्हाडा ठरवणार

परीक्षांची नवी तारीख म्हाडा ठरवणार आहे. याच कंपनीने 2 लाख पोलिसांच्या परीक्षा घेतल्या आणि व्यवस्थित पार पडल्या. पण यावेळी पोराच्या आयुष्याचा खेळ झाला असता ते थांबले आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तसेच म्हाडा अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रारही केली आहे. या पेपरफुटीने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

RRR : आलियाच्या तक्रारीवर राम चरण म्हणाला, तू सुंदर आहेस म्हणून मी लाजायचो!

Dombivali Crime : घर सोडण्यास नकार दिल्याने वृद्ध आई वडिलांना मारहाण, सुसंस्कृत डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

Video : कोल्हापुरातील गव्याने घेतला तरुणाचा बळी, वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें