ठाणे : मला पक्षातून काढून टाकणार होते, पण त्यावेळी शरद पवार यांनी सांगितलं जितेंद्रचा अभ्यास आहे, पण त्यावेळी ई माझी भूमिका बदलली नाही. राज ठाकरेंनी चार-चार भूमिका घेऊ नये असा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि शिवाजी महाराज यांचा अवमान होईल अशी विधाने केल्याने राज्यभर आंदोलने केली आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यातून हटवायला पाहिजे यासाठी पहिला आवाज उठवणारा मी असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. शिवसेनेचे संजय राऊत आणि मी आम्ही दोघेच राज्यपाल यांच्या विरोधात बोलत होतो, असं आव्हाड यांनी म्हंटलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे म्हातारे झाले असले तरी त्यांचा मेंदू सात-आठ वर्षाच्या पोरासारखा असल्याचा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे देखील आव्हाड यांनी म्हंटले आहे.