“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचे मुंडके छाटा आणि त्याची माळ करुन…” कालीचरण महाराजांची सडकून टीका
भाजपसह महायुतीचे नेते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता कालीचरण महाराज यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Kalicharan Maharaj on Rahul Gandhi : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती आहे. या निमित्ताने अनेकजण महाराजांना विनम्र अभिवादन करत आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक ट्वीट केले होते. या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण झाला. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजपसह महायुतीचे नेते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता कालीचरण महाराज यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कालीचरण महाराज यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राहुल गांधी यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने भाष्य केले. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे त्यांचा अपमान करणाऱ्यांचे मुंडके छाटा”, असे कालीचरण महाराज म्हणाले.
“अपमान करणाऱ्यांचे मुंडके छाटा”
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांचे मुंडके छाटा. त्यांच्या मुंडक्याची माळ तुळजाभवानीच्या गळ्यात घाला”, अशा शब्दांत कालीचरण महाराजांनी राहुल गांधी आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर निशाणा साधला.
“राहुल गांधी यांच्यासारख्या मूर्ख माणसावर काय बोलायचे? असा सवालही कालीचरण महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये सर्व हिंदूंनी सहभागी व्हा. छावा चित्रपट टॅक्स फ्री झाला पाहिजे, नाही झाला तरी सर्व हिंदूंनी हा चित्रपट पाहिलाच पाहिजे” या चित्रपटातून मुस्लिमांनी किती अत्याचार केला हे पाहायला मिळेल, असे कालीचरण महाराज म्हणाले.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण करणारे ट्वीट केले आहे. ”छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं। अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी। उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा।”. असे राहुल गांधी यांनी या ट्वीटमध्ये म्हटले होते. राहुल गांधी यांनी यात आदरांजली ऐवजी श्रद्धांजली शब्द वापरुन शिवाजी महाराज यांचा अवमान केला. यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.