AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : अनिकेतसोबतच अंत्यसंस्कार करा, चिठ्ठी लिहीत विवाहीतेचं टोकाचं पाऊल, दीड वर्षांपूर्वीच..

कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली अवघ्या दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या, सुखी संसाराची स्वप्न पाहिलेल्या विवाहीतेने टोकाचं पाऊल उचलंत आत्महत्या केली. मात्र मरणाला कवटाळण्यापूर्वी तिने लिहीलेली चिठ्ठी वाचून तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील.

Kalyan Crime : अनिकेतसोबतच अंत्यसंस्कार करा, चिठ्ठी लिहीत विवाहीतेचं टोकाचं पाऊल, दीड वर्षांपूर्वीच..
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 03, 2026 | 11:27 AM
Share

कल्याणमधून एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. अवघ्या दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या, सुखी संसाराची स्वप्न पाहिलेल्या विवाहीतेने टोकाचं पाऊल उचलंत आत्महत्या केली. सर्वात हादरवणारी गोष्ट म्हणजे, काही काळापूर्वीच तिच्या पतीने देखील आत्महत्या केली होती. त्याच्या मागोमाग आता त्याच्या पत्नीनेही आयुष्य संपवलं आहे. मात्र जीव देण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करा, माझ्या आजारी आई-वडिलांची सुटका करा आणि पती अनिकेतसोबतच अंत्यसंस्कार करा , अशा इच्छा तिने या सुसाईड नोटमध्ये लिहील्या आहेत. विवाहीत महिलेने हे टोकाचं पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत असून लाडकी मुलगी सोडून गेल्याने तिच्या कुटुंबियांवर तर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, श्रुती पवार असं मृत विवाहीत महिलेचं नाव असून अवघ्या दीड वर्षांपूर्वी तिने प्रेमविवाह केला होता. अनिकेत आणि श्रुती हे आनंदी जोडपं होतं. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून तिचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या छळाच्या काळात तिचा पती अनिकेत जगताप याने साथ न दिल्याने पती-पत्नी, या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. याप्रकरणीत महिला तक्रार केंद्रात वादानंतर अनिकेतने टोकाचं पाऊल उचललं आणि त्याने आत्महत्या केली होती. यामुळे श्रुतीला मोठा धक्का बसला होता.

त्यानंतर श्रुती व तिच्या कुटुंबीयांवर, अनिकेतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत तसेच चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी श्रुतीच्या आई-वडिलांना अटकही करण्यात आली. एवढी सगळी संकटं येऊनही श्रुती खंबीरपणे उभी होती, लढा देत होती.

उचललं टोकाचं पाऊल, नोटमध्ये काय लिहीलं?

मात्र याचदरम्यान वटपौर्णिमेच्या दिवशी, पत्नीने पतीचा जीव घेतल्याचे खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी व मानसिक दबाव टाकण्यात आला. त्यामुळे ती तणावाखाली होती, असं नातेवाईकांनी सांगितलं.याच तणावातून तिने टोकाचं पाऊलच उचलत आत्महत्या केली. मात्र आत्महत्या पूर्वी श्रुतीने सुसाईड नोट लिहीली. दोषींवर कठोर कारवाई करावी, आजारी आई-वडिलांच्या सुटकेची मागणी तिने केली आणि पती अनिकेतसोबतच अंत्यसंस्कार करण्याची इच्छा या नोटमध्ये तिने व्यक्त केली होती. या प्रकरणानंतर श्रुतीचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. कोळशेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ