
महापालिका निवडणुकांचां निकाल लागून 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतरही अनेक पालिकांत महापौरांची निवड झाली नव्हती. मात्र अखेर आज अनेक पालिकांना महापौर मिळाला असून त्यामध्ये कल्याण डोंबिवली (KDMC) आणि मीर-भाईंदरच्या महापौर पदाचा समावेश आहे. केडीएमसीच्या महापौरपदी हर्षाली थविल यांची निवड झाली आहे. तर मीरा भाईंदरमध्ये डिंपल मेहता यांची निवड झाली आहे. मात्र आंदोलनानंतरही अमराठी महापौर झाल्याने मराठी एकीकरण समिती चांगलीच संतापली आहे.
केडीएमसीमध्ये महापौरपदी हर्षाली थविल, विरोधात एकही अर्ज नाही
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल यांची महापौर म्हणून नियुक्ती झाली. तर उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले हे बिनविरोध निवडून आले आहेत. हर्षाली थविल यांच्याविरोधात एकही अर्जआला नाही, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. तीच गोष्ट राहुल दामले यांच्याबबातही हाच प्रकार घडला. त्यामुळे केडीएमसीला अखेर महापौर आणि उपमहापौर मिळाले आहेत. या आनंदाच्या क्षणी हर्षाली यानी प्रतिक्रिया व्यक्त केली. पदभार आज स्वीकारते त्याचा आनंद आहेच पण उत्सव शांततेत होईल. महायुतीचा विजय झाला असला तरी अजित पवारांच्या निधनाने सोहळ्यावर,सेलिब्रेशनवर संयम ठेवणार असल्याचे त्या म्हणाल्या.
सगळ्यांचे सहकार्य आणि जनतेच्या विश्वासामुळे आम्ही पदभार सांभाळणार.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुःखद निधन झालं आहे त्यामुळे आमचा उत्साह मोठा होणार होता मात्र आता आम्ही शांततेत तो उत्साह करत आहोत . दोन्ही पक्षाकडून हा सोहळा शांततेत पार पाडत आहोत असं त्यांनी नमूद केलं.
तर महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. त्यामुळे समोर कोणी उभा नाही यामुळे आमच्या नगरसेवकांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे याची आम्हाला जाणीव आहे असं उपमहापौर राहुल दामले म्हणाले. आम्ही युतीत लढलो. युतीमध्ये महापौर उपमहापौर याचा फॉर्म भरला नाही. एकत्र सभागृहात जाऊ आणि एकत्र जो निर्णय होईल त्याचा आनंद साजरा करू आणि उद्यापासून लोकांच्या कामाला लागू असंही त्यांनी नमूद केलं. भाजप शिवसेना आणि सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे फेटे बांधून मराठी पारंपारिक पद्धतीने सर्वजण सभागृहात जाणा असल्यातंही त्यांनी सांगितलं.
महापौर उपमहापौर निवडणुकीकरता उबाठा गटाचे नगरसेवक गैरहजर
महापौर उपमहापौर निवडणुकीकरता उबाठा गटाचे नगरसेवक गैरहजर होते. आश्चर्य म्हणजे उबाठाचे बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे आणि किती ढोणे हे देखील गैरहजर होते. उबाठाचे सर्व 11 नगरसेवक गैरहजर होते. निवडणूक पार पडल्यावर उबाठाचे ८ नगरसेवक सभागृहात आले.
मीरा भाईंदरमध्ये डिंपल मेहता महापौर, महाराष्ट्र एकीकरण समितीचा संताप
दरम्यान मीरा भाईंदरमध्ये डिंपल मेहता यांची महापौर म्हणून निवड झाली. त्यांना 79 मतं मिळाली. आणि उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील यांची निवड झाली. मात्र डिंपल मेहता यांच्या महाराष्ट्र एकीकरण समितीने याला विरोध दर्शवला होता. मीरा भाईंदरच्या सर्व जनतेने मला मोठा प्रतिसाद दिलेला आहे. निवडणुकांच्या वेळी आम्ही सर्व ठिकाणी फिरले होतो. जनतेची जी अपेक्षा आहे ते मी पूर्ण करेन. मी भाईंदरच्या विकासासाठी काम करेन असं यावेळी डिंपल मेहता म्हणाल्या. पाण्यासाठी मी लवकरात लवकर काम करणार आहे, सिमेंट रोड मेट्रोचं खूप काम आहे त्यांना गती देण्याचं काम करेन असंही त्या म्हणाल्या.
मी महाराष्ट्राची मुलगी
मी महाराष्ट्राची आहे असं म्हणत त्यांनी मराठी एकीकरण समितीच्या विरोधावरही उत्तर दिलं. मी महाराष्ट्राची मुलगी आहे. माझा जन्म इथला, माझे वडील आणि माझी आई, सर्वांचा जन्म याच महाराष्ट्रामध्ये झाला. आणि मी माझ्याकडे ओबीसी महिलांच्या सर्टिफिकेट आहे तर मी बाहेरची कशी होऊ शकते असा सवाल त्यांनी विचारला
मराठी एकीकरण समितीकडून आज पुन्हा मीरा-भाईंदर महापालिकेबाहेर आंदोलन
मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये मराठी महापौरच बसावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीकडून आज पुन्हा एकदा मीरा-भाईंदर महापालिकेच्या बाहेर आंदोलन केले जाणार आहे. मीरा भाईंदर मध्ये मराठीच महापौर व्हावा अशी मागणी मराठी कीकरण समिती मनसे आणि इतर राजकीय पक्ष आणि संघटनांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आज मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची एकच मागणी आहे की इथे मीरा-भाईंदर महापालिकेत मराठी महापौर करा. एक महिन्यापासून आमची हीच मागणी आहे. डिंपल मेहता दुसऱ्यांदा महापौर होत आहेत. पहिल्या वेळेससुद्धा आमचा त्यांना विरोध होता. नरेंद्र मेहता आमदार आहेत. दुसरे मोरारजी देसाई इथे तयार होत आहेत आणि घराणेशाही इथे सुद्धा पाहायला मिळते आहे. म्हणूनच डिंपल मिळताना दुसऱ्यांदा महापौर केलं जातंय असं मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले.
जर एवढा विरोध करून सुद्धा मराठी महापौर बसवला जाणार नसेल आणि डिंपल मेहताच महापौर बसतील तर आमचा आंदोलन अधिक तीव्र होईल. मीरा-भाईंदर आगरी कोळ्यांचे शहर आहे. मराठी माणसांचे शहर आहे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भाषणामध्ये सांगितलं होतं की महापौर मराठीच बसणार,असंही देशमुख म्हणाले.