कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, महापालिकेने उचललं मोठं पाऊल
कल्याण-डोंबिवली महापालिकेने नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणी देयक भरण्यासाठीची सोय वाढवण्यासाठी ३० नवीन भरणा केंद्र सुरू केली आहेत. आता एकूण ४८ केंद्र उपलब्ध आहेत. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत ही केंद्रे कार्यरत राहतील. यामुळे नागरिकांना घराच्या जवळच कर भरण्याची सोय होईल आणि गर्दी कमी होईल असा महापालिकेचा अंदाज आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.

मालमत्ता कर आणि पाणी देयक भरण्यासाठी होणारी गर्दी आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने एकूण ३० नवीन विशेष भरणा केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे आता एकूण केंद्रांची संख्या ४८ झाली आहे. पालिकेच्या या उपक्रमामुळे व्यापारी आणि नोकरदारांना दिलासा मिळाला आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत ही केंद्रे सुरू राहणार आहेत. यामुळे व्यापारी, नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या नवीन केंद्रांमुळे त्यांना आता आपल्या घराच्या जवळच कर भरण्याची सुविधा मिळणार आहे.
व्यापारी आणि नोकरदारांना दिलासा
नागरिकांनी वेळेवर मालमत्ता कर आणि पाणी देयक भरावे, तसेच मार्चअखेरपर्यंत पालिकेचा वसुलीचा लक्ष्यांक पूर्ण व्हावा, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. मागील आठवड्यात सुरू केलेल्या १८ केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी ही नवीन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यापूर्वी मालमत्ता कर विभागाचे काम संथ गतीने चालत असल्याची नागरिकांची तक्रार होती.
मात्र, उपायुक्त कांचन गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यापासून या कामाला गती मिळाली आहे. त्यांनी स्वतः विशेष भरणा केंद्रांना भेटी देऊन नागरिकांचा प्रतिसाद जाणून घेतला. त्यानंतरच नवीन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कर्मचारीही आता अधिक उत्साहाने काम करत आहेत. तर पालिकेच्या या उपक्रमामुळे व्यापारी आणि नोकरदारांना दिलासा मिळणार आहे सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत ही केंद्रे सुरू राहणार असल्याने व्यापारी, नोकरदार आणि व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. नवीन केंद्रांमुळे त्यांना आता आपल्या घराच्या जवळच कर भरण्याची सुविधा मिळणार आहे.
नव्याने सुरू झालेली भरणा केंद्रे:
अ प्रभाग: नेपच्युन स्वराज सेक्टर १, आंबिवली पश्चिम, थारवाणी इमारत वेदांत मिलेनया, टिटवाळा पूर्व, शंकेश्वर क्रिस्टर रस्ता, म्हस्कळ रस्ता, टिटवाळा पूर्व. ब प्रभाग: रोझाली संकुल, झुलेलाल चौक, बारावे, कल्याण, मिलिंदनगर, गौरीपाडा, चिकणघर, गुरू आत्मन सोसायटी, गौरीपाडा. क प्रभाग: व्हर्टेक्स सोसायटी, खडकपाडा. जे प्रभाग: कशीश गॅलेक्सी, ९० फुटी रस्ता, कचोरे, मोहन सृष्टी, नेतिवली. ड प्रभाग: कृष्णा पॅरेडाईज, तिसगाव, जरीमरी मंदिर रस्ता, तिसगाव, बिपिन मिश्रा, सह्याद्री पार्कजवळ, काटेमानिवली. फ प्रभाग: शितला मंदिर गोग्रासवाडी, सर्वोदय लिला, खंबाळपाडा, शेलार ऑफिस, शेलार नाका. ह प्रभाग: सुकऱ्या शिवा चौक, कोपरगाव, निता वैती ऑफिस, गणेशनगर, शिवसेना पदाधिकारी संदेश पाटील यांच्या कार्यालयाच्या जवळ, सत्यवान चौक, देवीचापाडा, अग्निशमन केंद्र, चिंचोड्याचा पाडा. ग प्रभाग: युगंधर सुदामा सोसायटी, मानपाडा रस्ता, कस्तुरी प्लाझा, मानपाडा रस्ता, बालाजी गार्डन, आयरे, कोपर पूर्व, धोत्रे मैदान, दत्तनगर. आय प्रभाग: गिता भवन सोसायटी, आडिवली, द्वारका हास्कूल, नमस्कार ढाब्याजवळ, मधुकर गॅलेक्सी, दावडी. ई प्रभाग: कासाबेला गोल्ड क्लब हाऊस, मानपाडा जुनी ग्रामपंचायत, नांदिवली जुनी ग्रामपंचायत.
