मोठी अपडेट! कल्याणमधील मारहाणप्रकरणी मोठा ट्विस्ट, त्या तरुणीने आरोपीच्या वहिनीला… नवा व्हिडीओ समोर
कल्याणमधील रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीच्या घटनेत एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. या नव्या व्हिडीओमुळे या प्रकरणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

कल्याणमधील रुग्णालयात काम करणाऱ्या एका मराठी तरुणीला परप्रांतीयाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. गोकुळ झा या गुंडाने तरुणीला लाथा-बुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. तिला जमिनीवर फरफटत नेले होते. यामुळे तरुणीच्या मानेला आणि छातीला इजा झाली होती. कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा दोघांनाही अटक करण्यात आली होती. या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यात एक नवा व्हिडीओ समोर आला असून यामुळे या प्रकरणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
नव्या व्हिडीओत नेमकं काय?
कल्याणमध्ये रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी मुलीला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले होते. आता या प्रकरणाचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ रुग्णालयातील असल्याचे पाहायला मिळत आहे. या नव्या व्हिडीओत आरोपी त्याचे नातेवाईक रुग्णालयात गोंधळ घालत असल्याचे दिसत आहे. त्यावेळी आरोपी हा रिसेप्शनच्या दिशेने जात आहे. यानंतर त्याचे नातेवाईक त्याला बाहेर काढतात. तसेच त्याची आईही त्याला अडवत असल्याचे दिसत आहे. यानंतर रिसेप्शनवर असणारी तरुणी तिथे येते आणि त्याच्या वहिनीला कानशिलात लगावते. हा व्हिडीओ घटनेच्या आधीचा असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कल्याणमधील समोर आलेला हा व्हिडीओ कधीचा आहे, याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. टीव्ही ९ मराठी या घटनेची पृष्टी करत नाही.
नेमकं प्रकरण काय?
कल्याणमध्ये एका रुग्णालयाच्या रिसेप्शनिस्टला मारहाण झाल्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. यावेळी आरोपी आणि तिच्या भावाकडून तरुणीला जबरदस्त मारहाण करण्यात आली. यात तिला गंभीर दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे. गोकुळ झा या गुंडाने तरुणीला लाथा-बुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. तिला जमिनीवर फरफटत नेले होते. यामुळे तरुणीच्या मानेला आणि छातीला इजा झाली. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.
दोन दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान याप्रकरणाचा तपास कल्याणमधील मानपाडा पोलीस करत आहेत. कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा दोघांनाही अटक झाली आहे. त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य आरोपी गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. यानंतर कोर्टाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या इतर आरोपीच्या नातेवाईकाची चौकशी केली जाणार आहे.
