सर्वसामान्य महिलांना लुबाडणाऱ्या काँग्रेसच्या ‘त्या’ महिला पदाधिकारीला बेड्या, शिवसेना महिला आघाडीच्या दणक्यानंतर कारवाई

मुद्रा लोन मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांना गंडा घालणारी काँग्रेसची पदाधिकारी शमीम बानो हीला पोलिसांनी अटक केली आहे (Kalyan Police arrest congress women leader Shamim Bano).

सर्वसामान्य महिलांना लुबाडणाऱ्या काँग्रेसच्या 'त्या' महिला पदाधिकारीला बेड्या, शिवसेना महिला आघाडीच्या दणक्यानंतर कारवाई

कल्याण (ठाणे) : मुद्रा लोन मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांना गंडा घालणारी काँग्रेसची पदाधिकारी शमीम बानो या भामट्या महिलेस शिवसेनेच्या महिलांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत शमीम बानो हिला अटक केली आहे. बानो हिला न्यायालयाने 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्या महिलांना या महिलेने गंडा घातला आहे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे (Kalyan Police arrest congress women leader Shamim Bano).

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पश्चिमेतील तहसील कार्यालयासमोर स्टॅम्प वेंडरची काम करणारी काँग्रेसची पदाधिकारी शमीम बानो हिला शिवसेनेच्या महिला आघाडीने मंगळवारी (24 फेब्रुवारी) संध्याकाळी चोप देत महात्मा फुले पोलिसांच्या हवाली केले होते. शमीम बानो हिने आधी नॅशनल बचत गटाच्या नावाने फी घेतली. त्यानंतर मुद्रा लोन मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक महिलांकडून लाखो रुपये उकळले. पैसे परत न मिळाल्याने महिलांनी शिवसेनेच्या नेत्यांना संपर्क साधला.

शिवसेनेच्या महिला आघाडीकडून बानोला चोप

शिवसेनेचे माजी नगरसेवक हर्ष वर्धन पालांडे, आशा रसाळ, आणि विजया पोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी शमीम बानोला चोप दिला. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बनकर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. शमीम बानो हिने फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी शमीम बानोसह शांती सिंग आणि प्रमोद सिंग या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन शमीमला अटक केली आहे.

पोलिसांचे आवाहन

या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकारी वैशाली गुळवे या करीत आहेत. आणखीन कोणाला शमीम बानोने फसविले असेल तर त्यांनी बाजारपेठ, महात्मा फुले पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मात्र या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे (Kalyan Police arrest congress women leader Shamim Bano).

संबंधित बातमी : काँग्रेसच्या महिला पदाधिकारीने लुबाडलं, शिवसेनेच्या महिला आघाडीनं चोपलं, कल्याणमध्ये तुफान राडा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI