कल्याणमधील लग्न समारंभात गर्दी, ‘वधूपिता’ शिवसेना माजी नगरसेवकावर गुन्हा

| Updated on: Apr 04, 2021 | 11:52 AM

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. एकाच ठिकाणी दोन विवाह सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं (Kalyan Shivsena crowd in Daughter wedding)

कल्याणमधील लग्न समारंभात गर्दी, वधूपिता शिवसेना माजी नगरसेवकावर गुन्हा
शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नात गर्दी
Follow us on

कल्याण : कल्याणमधील लग्न समारंभात गर्दी जमवल्या प्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नियम मोडून लग्नात मोठी गर्दी जमवल्याने कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. Tv9 मराठीने यासंदर्भात बातमी दाखवली होती. (Kalyan Shivsena former corporator Sunil Wayale booked for crowd in Daughter wedding)

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. एकाच ठिकाणी दोन विवाह सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. एका मुलीचे वडील माजी नगरसेवक सुनील वायले आहेत. तर दुसऱ्या मुलीचे वडील सुरेश म्हात्रे आहेत. दोन्ही वधूपित्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लॉन्स चालक रमेश सिंग यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले आणि शालिनी वायले यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात एकच गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्स तर सोडाच अनेकांच्या तोंडावर मास्क देखील नव्हते. विशेष म्हणजे लग्न समारंभासाठी वेळेची मर्यादा देखील आखून दिली असताना वेळेच्या मर्यादेचंही उल्लंघन करण्यात आलं होतं.

मुख्यमंत्र्यांचं आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पायदळी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (2 एप्रिल) सर्वसामान्य जनतेला नियम पाळण्याचं आवाहन केलं. कोरोना टाळण्यासाठी काय काय केले पाहिजे, हेही सांगितलं होतं. प्रसंगी भाजप नेत्यांना ठाकरेंनी टोला लगावला. मात्र त्यांचेच पदाधिकारी, नगरसेवक मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत हे दिसून आलं आहे. (Kalyan Shivsena former corporator Sunil Wayale booked for crowd in Daughter wedding)

मनसे-शिवसेनेत पुन्हा जुंपण्याची शक्यता

डोंबिवलीमध्ये आंदोलन करणाऱ्या मनसेच्या काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर कोपर आणि वडवली पुलाजवळ झालेल्या गर्दी संदर्भात गुन्हा कधी दाखल होणार? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे आता या लग्न समारंभानंतर सेना मनसेत जुंपणार हे नक्की. या विवाह सोहळ्याला अनेक नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली होती.

धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नातही गर्दी

याआधी, कोल्हापूरचे माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या शाही लग्न सोहळ्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. पुण्यात 21 फेब्रुवारीला झालेल्या लग्न सोहळ्याला तुफान गर्दी झाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं होतं.

संबंधित बातम्या :

शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नाला तुफान गर्दी, अनेकांच्या तोंडावर मास्क नाही, कोरोना नियम नेमके कुणासाठी?

धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह, पवार-फडणवीसांसह पाहुण्यांची गर्दी, पुण्यातील मंगल कार्यालयाला नोटीस

(Kalyan Shivsena former corporator Sunil Wayale booked for crowd in Daughter wedding)